शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाहित्य न देता २ लाखांचा गंडा, आरोपीला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 15:22 IST

राजकोटमध्ये कारवाई; १.९७ लाखांची रक्कम रिकव्हर

वर्धा : फेसबुकवरील शक्तीवान इंजिनीअरिंगची जाहिरात पाहून शेती अवजारे रोटावेटर व इतर शेती साहित्य खरेदीच्या नावावर तब्बल १ लाख ९७ हजार ६४० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्यास गुजरात राज्यातील राजकोट येथून सायबर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी अटक केली. अक्षय नरेनभाई भिंबा (२३, रा. पारडी, जि. राजकोट, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्यास ३ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

प्राप्त माहितीनुसार, सचिन नारायण दानव (रा. पवनार) याला शेती साहित्य घ्यायचे असल्याने त्याने फेसबुकवर शक्तीवान इंजिनीअरिंग ट्राॅली कंपनीची जाहिरात पाहिली. त्यावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेज करून संपर्क साधला. सचिनने शहानिशा करून रोटावेटर, नागर, तीरी पंजी, व्ही-पास एक्का अशा १ लाख ९७ हजार ६४० रुपयांच्या वस्तूंची ऑर्डर दिली. मात्र, साहित्य आले नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने १२ सप्टेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तांत्रिक तपासावरून आरोपी गुजरात येथील राजकोट येथून गुन्ह्याची सूत्रे हलवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने २७ ऑक्टोबर रोजी राजकोट गुजरात गाठून आरोपी अक्षयला बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक राहुल ईटेकार, कुलदीप टांकसाळे, सचिन सोनटक्के, रंजीत जाधव, निलेश कट्टोजवार, दिनेश बोथकर, अनुप राऊत, वैभव कट्टोजवार, निलेश तेलरांधे, मीना कौरती, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, विशाल मडावी, अमित शुक्ला, अनुप कावळे, अंकित जिभे, प्रतीक वांदिले, स्मिता महाजन यांनी केली.

चार दिवस राबविली शोधमोहीम

२७ ऑक्टोबर रोजी पोलिस पथक राजकोट येथे गेले. चार दिवस अहमदाबाद, राजकोट, जी.आय.डी.सी. शापर जिल्हा राजकोट येथे अहोरात्र तपास व शोधमोहीम राबवून आरोपी अक्षय भिंबा याला अटक केली. आरोपीकडून फसवणूक करण्यात आलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली. तसेच गुन्ह्यात वापरलेले मोबाईल हॅन्डसेट, बँक अकाऊंटचे एटीएम कार्ड असा एकूण १,९७,००० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीwardha-acवर्धा