भूविकास बँकेच्या कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 23:47 IST2018-11-06T23:46:51+5:302018-11-06T23:47:37+5:30
महाराष्ट्र शासनाने भूविकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजनेस ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे भूविकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांना योजनेनुसार त्यांच्याकडील असलेल्या वसुलपात्र मुद्दल त्यावर ६ टक्के सरळ व्याज ...........

भूविकास बँकेच्या कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र शासनाने भूविकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजनेस ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे भूविकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांना योजनेनुसार त्यांच्याकडील असलेल्या वसुलपात्र मुद्दल त्यावर ६ टक्के सरळ व्याज रकमेचा भरणा करून खाते बंद करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे, अशी माहिती अवसायक वर्धा जिल्हा कृषी ग्रामीण बहुविकास बँक मर्यादित वर्धा तथा जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी दिली आहे.
वालदे यांनी म्हटले आहे की, सदर योजनेत आजतागायत १३१ सभासदांनी रू. ८३.३५ लाख रक्कमेची भरणा करून त्यांना शासनाकडून ५४.८१ लाख रकमेची सवलत मिळाली आहे. अद्यापही ३५८ सभासद व सवलतीपासून वंचित आहेत. सदर योजनेंतर्गत सवलतीमध्ये कर्ज खाते बंद करण्याची मुदत ३१ मार्च पर्यंत आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकरी सभासदांनी शासनाच्या सदर ओटीएस योजनेत त्याच्याकडील थकीत कर्जाचा भरणा बँकेच्या मुख्य कार्यालयात वर्धा येथे अंतीम मुदतीपूर्वी करून या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा, असे जाहीर आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, वर्धा तथा अवसायक गौतम वालदे यांनी केले आहे.
मुदतीनंतर सदर थकीत कर्जाची रक्कम महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदीनुसार सक्तीने वसुल केली जाणार असल्यामुळे सदर योजनेपासून वंचित असलेल्या शेतकरी सभासदांनी बँकेच्या वर्धा येथील मुख्य कार्यालयास संपर्क साधून ओटीएस योजनेत कर्जाचा भरणा करून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन भूविकास बॅक व्यवस्थापनाने केले आहे.
बँकेचे व्यवहार ठप्प
राज्यातील बहुतांश भूविकास बँकांचा व्यवहार ठप्प झाला आहे. या बँका शासनाने अवसायानात काढल्या असल्याने त्याचे कर्ज भरण्यास कर्जदार शेतकरी तयार होत नाही. त्यामुळे शासनाने ही योजना जाहीर केली आहे.