नाफेड तूर खरेदीला मुदतवाढ द्या
By Admin | Updated: April 19, 2017 00:34 IST2017-04-19T00:34:23+5:302017-04-19T00:34:23+5:30
शासनाच्यावतीने नाफेडची तूर खरेदी बंद केली. यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे, असे म्हणत

नाफेड तूर खरेदीला मुदतवाढ द्या
शिवसेनेचा आर्वीत मोर्चा : एसडीओ कार्यालयावर धडक
आर्वी : शासनाच्यावतीने नाफेडची तूर खरेदी बंद केली. यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे, असे म्हणत शिवसेनेच्यावतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी तूर खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण ३,५०० शेतकऱ्यांनी तूर विक्रीकरिता नोंद केली आहे. यातच नाफेडची तूर खरेदी बंद झाली. यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या तुरीला २५०० ते ३००० रुपये दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान रोखण्याकरिता नाफेडच्या खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली.
मुदत वाढीच्या मागणीचे निवेदन शेतकरी बांधवांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्त्वात उपविभागीय अधिकारी यांना सोपविले. ते मुख्यमंत्री व पंतप्रधानमंत्री यांना पाठविण्याची मागणी केली. यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश देशमुख, आर्वी तालुका प्रमुख महेश चौधरी, शहरप्रमुख गणेश आजणे, नरेश वडणारे, मनीष अरसड, नितिन राहणे, दिनेश कालोकर, गौरव देशमुख, शैलेशकुमार अग्रवाल, प्रवीण देशमुखसह शेतकरी व युवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)