पीक विमा योजनेला मुदत वाढ

By Admin | Updated: November 10, 2014 22:48 IST2014-11-10T22:48:27+5:302014-11-10T22:48:27+5:30

हवामानावर आधारित कृषी विभागाच्या पीक विमा योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी ही मुदत ३१ आॅक्टोबरपर्यंतच होती. रब्बीची तालुक्यातील पेरणी आटोपत असून

Exposure to crop insurance scheme | पीक विमा योजनेला मुदत वाढ

पीक विमा योजनेला मुदत वाढ

आर्वी : हवामानावर आधारित कृषी विभागाच्या पीक विमा योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी ही मुदत ३१ आॅक्टोबरपर्यंतच होती. रब्बीची तालुक्यातील पेरणी आटोपत असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम लांबणीवर पडला. त्यात पावसाने दडी मारल्याने अपेक्षित उत्पादन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हाती लागल्याच्या आशा मावळल्या. तसेच उरलेल्या शेतातील सोयाबीन पीक कापणीला होणाऱ्या उत्पादनापेक्षा अधिक खर्च येत असल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन तसेच शेतात जनावरांसाठी सोडून रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रबी हंगाम पेरणीला प्रारंभ झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
हवामानावर आधारित पीक विमा योजनेंतर्गत दरवर्षी गहू, हरभरा पिकाची निवड केली जाते. परंतू यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप व रबी पिकाच्या पेरणीचा घोळ झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित पीक झाले नाही. नोव्हेंबर महिना उजाडला तरी खरीप हंगामाचे पीक घरी न आल्याने पुढच्या रबी पिकाची पेरणी कशी करावी या विवंचनेत तालुक्यातील शेतकरी सापडला आहे.
दरवर्षी साधारण: दिवाळीपूर्वी रबीतील गहू व हरभरा पिकाची ५० टक्के पेरणी शेतकरी आटोपत असते. परंतू यावर्षी मात्र दिवाळी उलटून दहा दिवस झाले तरी रब्बी हंगामाची शेत मशागतीची कामे झालेले नाही. रब्बी हंगामाची शेत मशागतीची कामे आता सुरू झाली असून नोव्हेंबरचा पहिला आठवडा सुरू झाला आहे. अद्याप रबी हंगामातील गहू व हरभरा पीक पेरणीला प्रारंभ झाला नाही. केवळ मशागतीचे काम झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पिकांची कापणी केली नाही. अनेक शेतात मशागतीचे काम सुरू असल्याचे एकूण चित्र आहे. रबी पिकांना व तुरीला अपेक्षित असणारी थंडी ही सुरू न झाल्याने या हंगामाची सर्व कामे संथगतीने सुरू आहे. यात या उशिरा पेरणी प्रारंभामुळे रबी हंगामातील पीक विमा योजनेला कृषी विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेता यावा यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच याचा फायदा होईल. नोव्हेंबर महिन्यात रबीची १५ ते २० टक्के पेरणी आटोपून जाते. मात्र यावर्षी तालुक्यातील निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने रब्बी हंगामासाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू आहे. नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला असूनही अजूनही रबी हंगाम पेरणीला तालुक्यात अद्याप प्रारंभ झाला नाही. अद्याप मशागतीची कामे सुरू आहे. सोयाबीन पिकाने दगा दिला तर ओलीताची कपाशी वगळता इतर कोरडवाहू शेतकऱ्यांची पऱ्हाटीवर लाल्या रोगाने आक्रमण केल्याने दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या हातून निघून गेल्याने आता त्यांची आर्थिक भिस्त रब्बी हंगामावर आहे.
राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित रबी हंगामातील हरभरा व गहू पिकांसाठी ३० नोव्हेंबर अंतिम तारीख दिली आहे. नोव्हेंबरचा पहिला आठवडा उजाडला तरी अद्याप रबी हंगामाची एक टक्केही पेरणी झाली नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांकडे काही कालावधी शिल्लक आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Exposure to crop insurance scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.