शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सख्ख्या भावाकडून लहान बहिणीचे शोषण; विकृत घटनेने शहरात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 13:15 IST

सख्या भावाचा बहिणीवर अत्याचार, नात्याला काळीमा फासणारी घटना

वर्धा : शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढतच चाललेली आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात अशा घटना कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच अत्याचार आणि बलात्काराच्या घटना दररोज घडताना दिसतात. पण, ही घटना वेगळीच घडली आहे.

वर्धा शहरात सख्ख्या भावानेच बहिणीचे शोषण केल्याची खळबळजनक धक्कादायक घटना उजेडात आली आहे. पीडित मुलीचे पोट दुखत असल्याने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेले असाता पीडिता ६ महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. भारतीय संस्कृतीत काही नाती खूप पवित्र मानली जातात. त्यामध्ये आई-मुलगा व बहीण भावाचे नाते सामील आहे. मात्र, वर्धा शहरात मानवतेला कलंकित करणारे प्रकरण समोर आले आहे. सख्या भावाने बहिणीवर अत्याचार करण्याची लाजीरवाणी घटना घडली.

१५ वर्षीय पीडिता घरी होती. तिचे आई वडिल बाहेर कामानिमित्त गेले होते. याची संधी साधून नराधम १७ वर्षीय भावाने बहिणीचे शोषण केले. पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला घरच्यांनी सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उजेडात आल्याने घरच्यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली. शहर पोलीस ठाण्यातील पोस्को सेलने घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या भावाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ

पीडिता सहा महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी थेट पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पीडितेची विचारपूस केली असता पीडितेने बयाण देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. पीडिता माहिती देण्यास टाळाटाळ करीत होती.

समुपदेशनानंतर प्रकार आला उजेडात

पीडिता माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने हे प्रकरण सखी वन स्टॉप सेंटरकडे सोपविण्यात आले. सेंटरच्या केंद्र प्रशासक रेशमा रघाटाटे यांनी पीडित मुलीचे समुपदेशन केले. तीला धीर देत विचारपूस केली असता पीडितेने घडलेला सर्व प्रकार पानावलेल्या डोळ्यांनी कथित केला. पीडितेचे बयाण नोंदविल्यानंतर शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

विधीसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

सख्ख्या बहिणीचे शोषण केल्याच्या धक्कादायक प्रकरणात शहर पोलिसांनी विकृत असलेल्या १७ वर्षीय भावाला ताब्यात घेतले. त्याचेही बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती शहर पोलािसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगwardha-acवर्धा