शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञ डॉक्टरांनी आणखी चौघांना दिली क्लिनचिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

यापूर्वी चीन येथील बिजिंग येथून येथील हिंदी विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या १३ विद्यार्थ्यांना तर साऊथ कोरीया येथून आलेल्या एका व्यक्तीला १४ दिवस तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगरानीत ठेऊन क्लिनचिट देण्यात आली आहे. तर इंडोनेशिया येथून आलेल्या दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

ठळक मुद्देकोरोनासाठी कसली कंबर : दोघांचा अहवाल निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण अद्याप वर्धा जिल्ह्यात आढळलेला नाही. असे असले तरी विदेशातून आणि कोरोनाने भारतात पहिला बळी घेतलेल्या कर्नाटकातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालींवर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेऊन आहेत. विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या २६ व्यक्तींना आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या निगरानीत १४ दिवस ठेऊन रविवार १५ मार्चपर्यंत १४ व्यक्तींना कोरोनाचे कुठलेही लक्षण नसल्याची क्लिनचिट देण्यात आली. तर १४ दिवस निगरानीत ठेऊन कोरोनाची लक्षण न आढळल्याने मंगळवारी आणखी चार व्यक्तींना क्लिनचिट देण्यात आली आहे.यापूर्वी चीन येथील बिजिंग येथून येथील हिंदी विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या १३ विद्यार्थ्यांना तर साऊथ कोरीया येथून आलेल्या एका व्यक्तीला १४ दिवस तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगरानीत ठेऊन क्लिनचिट देण्यात आली आहे. तर इंडोनेशिया येथून आलेल्या दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. सदर अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आता दुबई येथून आलेले सात, अ‍ैझान येथून आलेला एक तर सोमवार १६ मार्चला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून जिल्हा प्रशासनाला कोरोना बाधित देशातून प्रवास करुन आलेल्या ४५ व्यक्ती आणि कर्नाटकातील कलबुर्गी येथून आलेल्या सहा विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या निगरानीत ठेवण्यात आले आहे. एकूणच विदेशवारीसह कर्नाटक येथून आलेल्या या ५९ व्यक्तींमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे आतापर्यंत आढळून आलेली नाही; पण दक्षता म्हणून त्यांना त्यांच्या घरात म्हणजे होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी त्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेऊन आहेत. क्लिनचिट मिळालेल्यांमध्ये इंडोनेशिया येथून आलेल्या दोघांचा तर इटली आणि इरान येथून आलेल्या प्रत्येकी एक व्यक्तीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. परंतु, दक्षता म्हणून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. शिवाय वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. खोकलताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल धरावा.- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर