तज्ज्ञ डॉक्टरांनी आणखी चौघांना दिली क्लिनचिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:06+5:30

यापूर्वी चीन येथील बिजिंग येथून येथील हिंदी विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या १३ विद्यार्थ्यांना तर साऊथ कोरीया येथून आलेल्या एका व्यक्तीला १४ दिवस तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगरानीत ठेऊन क्लिनचिट देण्यात आली आहे. तर इंडोनेशिया येथून आलेल्या दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

Expert doctor gave clinichat to four more | तज्ज्ञ डॉक्टरांनी आणखी चौघांना दिली क्लिनचिट

तज्ज्ञ डॉक्टरांनी आणखी चौघांना दिली क्लिनचिट

ठळक मुद्देकोरोनासाठी कसली कंबर : दोघांचा अहवाल निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण अद्याप वर्धा जिल्ह्यात आढळलेला नाही. असे असले तरी विदेशातून आणि कोरोनाने भारतात पहिला बळी घेतलेल्या कर्नाटकातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालींवर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेऊन आहेत. विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या २६ व्यक्तींना आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या निगरानीत १४ दिवस ठेऊन रविवार १५ मार्चपर्यंत १४ व्यक्तींना कोरोनाचे कुठलेही लक्षण नसल्याची क्लिनचिट देण्यात आली. तर १४ दिवस निगरानीत ठेऊन कोरोनाची लक्षण न आढळल्याने मंगळवारी आणखी चार व्यक्तींना क्लिनचिट देण्यात आली आहे.
यापूर्वी चीन येथील बिजिंग येथून येथील हिंदी विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या १३ विद्यार्थ्यांना तर साऊथ कोरीया येथून आलेल्या एका व्यक्तीला १४ दिवस तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगरानीत ठेऊन क्लिनचिट देण्यात आली आहे. तर इंडोनेशिया येथून आलेल्या दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. सदर अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आता दुबई येथून आलेले सात, अ‍ैझान येथून आलेला एक तर सोमवार १६ मार्चला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून जिल्हा प्रशासनाला कोरोना बाधित देशातून प्रवास करुन आलेल्या ४५ व्यक्ती आणि कर्नाटकातील कलबुर्गी येथून आलेल्या सहा विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या निगरानीत ठेवण्यात आले आहे. एकूणच विदेशवारीसह कर्नाटक येथून आलेल्या या ५९ व्यक्तींमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे आतापर्यंत आढळून आलेली नाही; पण दक्षता म्हणून त्यांना त्यांच्या घरात म्हणजे होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी त्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेऊन आहेत. क्लिनचिट मिळालेल्यांमध्ये इंडोनेशिया येथून आलेल्या दोघांचा तर इटली आणि इरान येथून आलेल्या प्रत्येकी एक व्यक्तीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. परंतु, दक्षता म्हणून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. शिवाय वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. खोकलताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल धरावा.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

Web Title: Expert doctor gave clinichat to four more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.