नाणी प्रदर्शनातून उलगडले चलनाचे गतकालीन वैभव
By Admin | Updated: February 28, 2016 02:13 IST2016-02-28T02:13:36+5:302016-02-28T02:13:36+5:30
प्राचीन इतिहास, संस्कृती व चलन प्रणीलीची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावी, तरुण पिढीला छंद जोपासून प्राचीन वस्तूंचा ठेवा टिकवून ठेवण्यासाठी ...

नाणी प्रदर्शनातून उलगडले चलनाचे गतकालीन वैभव
ऐतिहासिक वारसा : इतिहासाचा अभ्यास, राज्याची स्थाने, नावेम क्रमवारी कळण्यास मदत
रोहणा : प्राचीन इतिहास, संस्कृती व चलन प्रणीलीची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावी, तरुण पिढीला छंद जोपासून प्राचीन वस्तूंचा ठेवा टिकवून ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने एकदिवसीय नाणे प्रदर्शनाचे आयोजन स्थानिक वसंतराव कोल्हटकर कला महाविद्यालयातील इतिहास विभागाद्वारे करण्यात आले होते. या प्रदर्शनातून चलनाचे गतकालीन वैभव पहावयास मिळाले
नाणे प्रदर्शनाचे उद्घाटन नारायणराव काळे स्मृती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कारंजा घाडगेच्या इतिहास विभागप्रमुख प्रा. वंदना तागडे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नितीन माथनकर, तर प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्रसिंह ऊर्फ बाबा व्यास कला महाविद्यालय कोंढाळीचे प्रा. डॉ. गोपीचंद कठाणे उपस्थित होते. इतिहासाचा अभ्यास करताना महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या साधनांमध्ये त्या-त्या काळातील नाण्यांचा समावेश होतो. व्यापार आर्थिक विनिमय, सुबत्ता, अवनती, तंत्रज्ञानात्मक प्रगती, राजकीय यंत्रणा, तत्वज्ञान, धार्मिक कल्पना, कला कुसर इत्यादी पैलूंविषयी ऐतिहासिक नाणी बोलू शकतात. नाण्यामुळे रोजचा काळ, राज्याची स्थाने, त्यांची नावे, यांची क्रमवारी, त्यांच्या सीमा कळण्यास मदत होते. नाण्याचे वजन, आकार, प्रकार, धातू, नाण्यांकरिता मजकूर, चित्रे, चिन्हे, नाण्यांचे दर्शनी मुल्य, त्याची टाकसाळ आदी गोष्टी महत्त्वाच्या असतात असे प्रा. तागडे यांनी प्रतिपादित केले. नाणी प्रदर्शनात इ. स. १८३५ ते २०१० पर्यंतची दुर्मीळ नाणी होती. वैदिक काळात दीड क्विंटल धान्याच्या मोबदल्यात एक गाय आणि वासरु दिले जायचे. प्रदर्शनात गाय, वासरू असलेली पितळाची प्रतिमा ठेवलेली होती. इ. स. पूर्व सहाव्या शतकात नाण्याचा शोध लागला. त्यानंतरच्या आंत्र्यशाहीतील पाचव्या आणि सहाव्या राजा जॉजर्च चित्र असलेले तांब्याचे गोलाकार, हॉफ क्वार्टर एक आणि दोन पैसे ठेवलेले होते. कमळ चिन्ह असलेले १९६९ चे पितळीचे २० पैशांचे नाणेही ठेवले होते.
संसद, स्वतंत्रता आंदोलनाची ५० वर्षे, पंडीत नेहरू यांच्या चित्रांचे पितळीचे ५० पैशाचे नाणे, जयप्रकाश नारायण, सेल्युलर जेल, पंडीत नेहरू यांच्या चित्रांचे एक रुपयाचे नाणे, सरदार पटेल, श्री. अरविंद, छत्रपती शिवाजी, लूई ब्रेल, संत तुकाराम, देशबंधु चित्तरंजनदास, सुभाषचंद्र बोस, राजा जॉर्ज, संत तिरुवलूर यांच्या चित्रांची नाणी, महात्मा गांधी, पंडीत नेहरु, इंदिरा गांधी, अल्फोसो, कुका आंदोलन, रवींद्रनाथ टागोर, भगवान महावीर, राणी व्हिक्टोरिया चाणक्य, वैष्णोदेवी, दाराभाई नौरोजी, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या चित्रांचे नाणे, शिवरायांच्या राजमुद्रेचा मजकूर असलेली तांब्याची अंगठी, शिवाजी व तुळजाभवानी चित्राचे पदक या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.
पुणे व वाकगाव येथील टाकसाळीच्या नाण्याचे १०३० ते १२४३ पर्यंतचे चित्र, छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी कालीन शिवराई व शंभुराई, चौथ्या विल्यमचा रुपया, मुंबई, अहमदाबाद सहारणपूर, कुचबिहार व लाहोरचे नाणेचित्र विविध पोस्टल स्टॅम्पची चित्रे या प्रदर्शनात होती. प्रास्ताविक व नाणे संकलक प्रा. डॉ. तीर्थनंदन बन्नगरे यांनी केले. संचालन देवयानी मुडे तर आभार जयश्री चितळकर हिने मानले.(वार्ताहर)