खळबळजनक! वर्ध्यात बंदूक आणि चाकू दाखवत दिवसाढळ्या बँकेवर दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 12:01 IST2020-12-17T12:00:23+5:302020-12-17T12:01:06+5:30
Wardha news Robbery गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शहरातील बँकेत दरोडा घालून तीन लाख रोकडसह साडेतीन किलोचे सोने लुटल्याची खळबळजनक घटना घडली.

खळबळजनक! वर्ध्यात बंदूक आणि चाकू दाखवत दिवसाढळ्या बँकेवर दरोडा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शहरातील बँकेत दरोडा घालून तीन लाख रोकडसह साडेतीन किलोचे सोने लुटल्याची खळबळजनक घटना घडली. मुथुट फायनान्सच्या बँकेचे कामकाज गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुरू होत होते. तितक्यात मास्क लावलेल्या व डोके झाकलेल्या दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. बंदूक व चाकूच्या धाकावर त्यांनी कर्मचाऱ्यांना गप्प बसायला लावले व बँकेवर दरोडा घातला. यात त्यांनी तीन लाख अठरा हजार रुपयांची रोकड व साडेतीन किलो सोने लुटून नेले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास काम सुरू केले आहे.