शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत परीक्षाच; पण कोण पास होणार? मोदींच्या सभेची प्रतीक्षा; वंचित, बसपाही निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 06:41 IST

भाजपने तिसऱ्यांदा तडस यांना मैदानात उतरविले आहे.

रवींद्र चांदेकर, लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटाचे अमर काळे या नवख्या उमेदवाराने भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार रामदास तडस यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. या दोघांच्या लढतीत बसपा आणि वंचितचे उमेदवार रंगत भरणार आहेत. शिवाय तडस यांची स्नुषाही मैदानात उभी ठाकली आहे. भाजपला सहज वाटणारी ही निवडणूक आता रंजक वळणावर पोहोचली असून, भाजप उमेदवारासाठी परीक्षाच आहे. भाजपने तिसऱ्यांदा तडस यांना मैदानात उतरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वलय असले तरी नाराजी दूर करण्यात ते कितपत यशस्वी होणार, हा कळीचा मुद्दा आहे.  

कुणबी आणि तेली हा जात फॅक्टरही महत्त्वाचा ठरणार आहे. वंचित आणि बसपाचा उमेदवार किती मते खेचणार, यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे. गेल्या निवडणुकीत या दोन उमेदवारांनी ७२ हजारांच्यावर मते घेतली होती. तडस यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. ‘महाविकास’च्या उमेदवारासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा, तर उद्धवसेनेचे आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे. त्यानंतर चित्र कसे बदलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

वर्धेत पहिल्यांदाच पंजा गायबआतापर्यंतच्या सर्व निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार रिंगणात होता. मात्र, यावेळी प्रथमच काँग्रेसऐवजी महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचा उमेदवार लढत आहे. त्यामुळे यंदा प्रथमच काँग्रेसचे ‘पंजा’ हे चिन्ह असणार नाही. त्याचा नेमका कुणाला लाभ हाेणार आणि कुणाला फटका बसणार, याच्या खुमासदार चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहेत. रामदास तडस आणि अमर काळे हे दोन्ही महत्त्वाचे उमेदवार तूर्तास पदयात्रा, रॅलीत, कॉर्नर सभांमध्ये व्यस्त आहेत. सध्या ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा उठला आहे.

गटातटांचा काय होणार परिणाम?- महायुतीत सहभागी भाजप, अजित पवार गट, शिंदेसेना, आरपीआय (आठवले) गटात काही प्रमाणात कुरबुरी आहेत. अजित पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी योगी यांच्या सभेत योग्य सन्मान न दिल्याचा मुद्दा थेट मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मांडण्याचा घाट घातला आहे. - महाविकास आघाडीतील उद्धवसेनेने उमेदवाराच्या पाेस्टरवर सहसंर्पक प्रमुख आणि जिल्हाप्रमुखांचे छायाचित्र नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या सर्वांचा परिणाम दोन्ही उमेदवारांवर कितपत होतो, यावरही बरेच काही अवलंबून आहे.

एकूण मतदार    १६,७४,८८३ पुरुष - ८,५४,९०३ महिला - ८,१९,९६७ निवडणुकीतील कळीचे मुद्देमहात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पुनीत वर्धा लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत कधीच जाती, पातींना थरा नव्हता. मात्र, गेल्या काही निवडणुकीत जातीय फॅक्टर महत्त्वाचा आहे. कुणबी आणि तेली मतदारांची संख्या जादा आहे. हेच मतदार दोन्ही उमेदवारांसाठी निर्णायक ठरतील.दहा वर्षांत मतदारसंघात कोणताही मोठा उद्योग आला नाही. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेतीमालाला वाजवी दर मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहे. त्यात भाजपने जुनाच चेहरा रिंगणात उतरविला आहे.यंदा प्रथमच काँग्रेसचा उमेदवार मैदानात नाही. काँग्रेसच्या माजी आमदार असलेले काळे यांना ऐनवेळी पक्षात घेऊन शरद पवार गटाने उमेदवारी दिली.

२०१९ मध्ये काय घडले?रामदास तडस    भाजप (विजयी)    ५,७८,३६४चारुलता टोकस    काँग्रेस    ३,९१,१७३शैलेशकुमार अग्रवाल बसपा    ३६,४२३नोटा    -    ६,५१०

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते     २०१४    रामदास तडस     भाजप    ५,३७,५१८२००९    दत्ता मेघे    काँग्रेस    ३,५२,८५३     २००४    सुरेश वाघमारे    भाजप    २,६९,०४५      १९९९    प्रभा राव    काँग्रेस    २,४९,५६४     १९९८    दत्ता मेघे    काँग्रेस    ३,२८,९०५     

टॅग्स :wardha-acवर्धाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Ramdas Tadasरामदास तडस