शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगराध्यक्षाचा पतीच निघाला ‘मास्टरमाईंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 05:00 IST

या प्रकरणात वसंता हा फितूर होऊन आपल्याला शिक्षा लागू शकते, अशा भीतीपोटी त्याच्या हत्येचा कट रचून त्याला जिवानिशी संपविल्याचे भास्कर इथापे याने पोलिसांना सांगितले. तिन्ही आरोपींना अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पुढील तपास उपविभागीय अधिकारी पीयूष जगताप हे करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांनी पत्रपरिषदेतून दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्थिक व्यवहारातून पालोती येथील रहिवासी वसंत चोखोबा हातमोडे (६५) याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. वसंताच्या हत्येचा कट माजी नगरध्यक्षाचा पती भास्कर दादाराव इथापे याने रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, भास्कर इथापेसह विलास मून, दिलीप नारायण लोखंडे रा. नागठाणा यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत वसंत हातमोडे याचा मृतदेह रोठा तलावालगतच्या गेज चेंबरच्या विहिरीत सिमेंटच्या खांबाला बांधून फेकण्यात आला होता. याप्रकरणी वसंताचा मुलगा नीलेश याने सावंगी ठाण्यात तक्रार नोंदविलेली होती. सावंगी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास केला असता मृत वसंत हातमोडे, भास्कर इथापे, विलास मून दिलीप लोखंडे यांनी बनावट कागदपत्रांद्वारे एका शेतीची विक्री करुन त्याचा मोबदला घेतला असल्याची माहिती मिळाली. तसेच या प्रकरणात पुलगाव पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये चौघांवर गुन्हा देखील दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भास्कर इथापेसह दोघांना अटक केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली. तसेच मृत वसंत हातमोडे हा अपहारातील रकमेची वारंवार मागणी करीत होता. तर या प्रकरणात वसंता हा फितूर होऊन आपल्याला शिक्षा लागू शकते, अशा भीतीपोटी त्याच्या हत्येचा कट रचून त्याला जिवानिशी संपविल्याचे भास्कर इथापे याने पोलिसांना सांगितले. तिन्ही आरोपींना अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पुढील तपास उपविभागीय अधिकारी पीयूष जगताप हे करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांनी पत्रपरिषदेतून दिली. ही कारवाई एसपी प्रशांत होळकर, यशवंत सोळंकी, एसडीपीओ पीयूष जगताप, पीआय संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरात, डीबी पथक तसेच सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, उपनिरीक्षक सौरभ घरडे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले यांनी केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस