राष्ट्राकरिता सर्वकाही ही भावना महत्त्वाची!
By Admin | Updated: December 17, 2015 02:13 IST2015-12-17T02:13:54+5:302015-12-17T02:13:54+5:30
प्रत्येकाने देशाच्या विकासाकरिता प्रयत्न केला पाहिजे आणि यासाठी राष्ट्राकरिता सर्वकाही ही भावना महत्त्वाची आहे,

राष्ट्राकरिता सर्वकाही ही भावना महत्त्वाची!
सचिन बिरे : वक्तृत्व स्पर्धा
देवळी : प्रत्येकाने देशाच्या विकासाकरिता प्रयत्न केला पाहिजे आणि यासाठी राष्ट्राकरिता सर्वकाही ही भावना महत्त्वाची आहे, असे विचार देवळी पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस निरीक्षक सचिन बिरे यांनी व्यक्त केले.
नेहरू युवा केंद्र वर्धा व स्थानिक एस.एस. एन.जे महाविद्यालयातील एन.सी.सी. विभागाच्या वतीने ‘राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्र उभारणी’ या विषयावर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा पार पडली. तालुक्यातील १५ स्पर्धेकांनी भाग घेतला असून एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पहिले तीनही पुरस्कार पटकावून महाविद्यालयाचे नाव उंचावले. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय तर प्रमुख अतिथी सचिन हिरे व एन.सी.सी. आॅफिसर लेफ्टनंट प्रा. मोहन गुजरकर उपस्थित होते. सार्जेंट कोमल सोहन गोमासे इयत्ता १२ वाणिज्य विभाग हिने प्रथम तर लिना खंडाळकर बि.ए. तृतीय व कॅडेट डिंपल वरघणे इयत्ता ११ वाणिज्य विभाग यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. अतिथींच्या हस्ते विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. अंडर आफिसर रवी बकाले, सार्जेंट सुरज पोटफोडे व आशिष कांबळे यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. संतोष मोहधरे, प्रा. प्रभाकर ढाले, प्रा. विवेक देशमुख व प्रा. जगदीश यावले होते. संचालन आकांक्षा उगेमुगे यांनी केले तर आभार प्रा. अमित चिनेवार यांनी मानले.(प्रतिनिधी)