तरोडा आदर्श ग्राम करण्यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक
By Admin | Updated: January 31, 2015 23:25 IST2015-01-31T23:25:00+5:302015-01-31T23:25:00+5:30
आदर्श ग्राम निर्माणात भौतिक सुविधांबरोबरच गावाचा सर्वांगिण विकास होणे आवश्यक आहे. एकमेकांशी नाते अधिक दृढ, होणे आवश्यक आहे. समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने

तरोडा आदर्श ग्राम करण्यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक
पालकमंत्री : जनधन योजनेंतर्गत ग्रामस्थांना बँकेच्या पासबुकचे वितरण
वर्धा : आदर्श ग्राम निर्माणात भौतिक सुविधांबरोबरच गावाचा सर्वांगिण विकास होणे आवश्यक आहे. एकमेकांशी नाते अधिक दृढ, होणे आवश्यक आहे. समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून प्रारंभ केला तरच देशाची प्रगती होणे शक्य आहे. प्रगतीबरोबरच आई-वडीलांचा सांभाळही प्रत्येकाने करावा, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले. संस्कृतचे व्यासंगी मा.गो.वैद्य यांच्या सारख्या महान व्यक्तींच्या गावात सर्वांनी मिळून आदर्शग्रामाकरिता पुढकार घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिला.
जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी नगर जिल्ह्यातील हिवरेबाजार हे आदर्श गाव असल्याने त्या धरतीवर अधिक सक्षमपणे आपणही आदर्श ग्राम बनविण्यासाठी एकत्र यावे, असे प्रतिपादन केले. यावेळी खा. रामदास तडस यांनीही गावाच्या विकासाकरिता सर्वतोपरी प्रयत्न प्रशासनातर्फे करण्यात येत असून ग्रामस्थांनीही सकारात्मकतेने यापुढेही सहकार्य करावे, असे सांगितले.
यावेळी आ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, जिल्हा परिषद अध्यक्ष चित्रा रणनवरे, शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, सामाजिक वनीकरण विभागाचे बडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भूयार, तहसीलदार राहुल सारंग आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी सभागृह बांधकामाचा श्रीफळ वाढवून पालकमंत्री यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमामध्ये पालकमंत्र्यांच्याहस्ते जनधन योजनेच्या लाभार्थी मंदा बोरकर, सुनंदा तिमांडे, अंजना लांडगे, सुस्मिता बोरकर, भारत टेंबसे, बेबीनंदा ताकसांडे आणि सुनंदा कोरडे यांना पंजाब नॅशनल बँकेचे पासबुक वितरित करण्यात आले. यावेळी बँकेचे सहायक सरव्यवस्थापक शर्मा यांचीही उपस्थिती होती. वर्ग दोन मधील जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरीत केलेला सातबारा हरिभाऊ तिमांडे, विनोद तिमांडे, ज्ञानेश्वर बलखंडे, शालिक चांभारे आणि नत्थु तिमांडे यांना पालकमंत्र्यांच्याहस्ते वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूयार यांनी केले. संचालन प्रकाश डायरे यांनी केले तर आभार राहुल सारंग यांनी मानले.(प्रतिनिधी)