शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

वेश बदलला तरी 'फेस' ओळखणार; 'एआय' कॅमेरे वर्धेवर नजर ठेवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 16:53 IST

वर्धेवर आता स्मार्ट 'सीसीटीव्हीं'चा 'वॉच' : जुने कॅमेरेही करण्यात आले अपग्रेड

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सराईत गुन्हेगारांच्या तसेच वाँटेड आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी वर्धा आणि हिंगणघाट शहरात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बेस (एआय) कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. यातील एआय बेस फेस रेकग्नायझेशन यंत्रणेमुळे शहरात दाखल झालेल्या सराईत गुन्हेगारांची माहिती मिळविण्यात पोलिसांना आता मदत होणार आहे. वर्धा शहरात ९५ वर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, वर्धेकरांवर आता तिसऱ्या डोळ्याचा 'वॉच' राहणार आहे.

शहरातील संशयास्पद घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी वर्धा शहरात ९३ आणि हिंगणघाट शहरात जवळपास ६०, असे एकूण १५२ स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. इतकेच नव्हे तर सर्व जुने सीसीटीव्ही कॅमेरेदेखील अपग्रेड करण्यात आलेले आहेत. या माध्यमातून शहर, राज्यासह देशभरातील वाँटेड असलेल्या आरोपींना ओळखणे शक्य होणार आहे.

२०२० मध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल युनिटला आग लागून सर्व खाक झाले होते तेव्हापासून शहरातील तिसरा डोळा बंदच होता. तत्कालीन पोलिस अधीक्षक नूरूल हसन यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी पाठपुरावा केला होता. निधीही मंजूर झाला होता, आता सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. शहरातील पोस्ट ऑफिस चौक, बसस्थानक चौक, रेल्वे स्थानक चौक, मुख्य मार्ग, शिवाजी महाराज चौक, इतवारा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सामान्य रुग्णालय परिसर चौक, सिव्हिल लाईन्स परिसर आदी विविध मुख्य ठिकाणी एआय बेस कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. काळानुरूप गुन्हेगारीदेखील हायटेक झाल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण होत आहे. 

तर अनेकदा एका शहरात गुन्हा करून आरोपी दुसऱ्या शहरात वास्तव्य करतो. मात्र, असे गुन्हेगार शहरात आले, की त्यांचा थांगपत्ता लागत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आता वर्धा पोलिसांकडूनदेखील अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून आरोपींना पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून आता फेस रेकग्नायझेशन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. गुन्हेगारांनी पेहराव बदलला तरी चेहऱ्याच्या ठेवणीवरून हे सराईत आरोपी कॅमेऱ्यात तत्काळ कैद होतील. त्यामुळे सराईत आरोपींची चलाखीही येथे काम करणार नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 

तत्काळ कारवाई करणे होणार शक्यसीसीटीव्हीच्या माध्यमातून फेस रिकग्नायझेशन सिस्टीमचे काम चालणार आहे. सीसीटीव्हीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा चेहरा या यंत्रणेच्या माध्यमातून कॅप्चर' होईल. त्यानंतर पोलिसांकडे असणाऱ्या गुन्हेगारांच्या माहितीनुसार गुन्हेगार किंवा संशयित, यामध्ये आढळून आल्यास त्याची सूचना नियंत्रण कक्षाला मिळून संबंधित ठिकाणी तत्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे. 

गर्दीच्या ठिकाणी राहणार तिसऱ्या डोळ्याचा 'वॉच' अनेकदा स्थानक परिसरात मोबाइल चोरी, पाकीटमारीच्या घटना घडतात. यासह प्रवासादरम्यान सोन्याच्या दागिन्यांचीही चोरी केली जाते. प्रमुख शहरांना गुन्हेगारांचा धोकादेखील असतो. गर्दीच्या ठिकाणी अशा हालचाली होतात. अशा ठिकाणांहून गुन्हेगारांना पळ काढणे सोपे असते. मात्र, या यंत्रणेची अंमलबजावणीमुळे हा धोका कमी होणार असून प्रत्येक चौकातील घडामोडींवर बारीक लक्ष राहणार आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धाCrime Newsगुन्हेगारी