स्वच्छ भारत अभियानानंतरही गावात अस्वच्छता
By Admin | Updated: November 17, 2014 23:00 IST2014-11-17T23:00:15+5:302014-11-17T23:00:15+5:30
स्वच्छ भारत अभियान राबविताना प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, अंगणवाडी व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने जनप्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला़ गावातून प्रभातफेरी काढण्यात आली़ दरम्यान,

स्वच्छ भारत अभियानानंतरही गावात अस्वच्छता
आकोली : स्वच्छ भारत अभियान राबविताना प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, अंगणवाडी व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने जनप्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला़ गावातून प्रभातफेरी काढण्यात आली़ दरम्यान, रस्त्याच्या कडेला दिसणारे कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या, रस्त्याने वाहणारे पाणी पाहून सहभागींचे चेहरे पाहण्यायोग्य होते़ स्वच्छता अभियान राबवित असताना गावात मात्र अस्वच्छतेचा कळस दिसून येत होता़
देशभरात महास्वच्छता अभियान सुरू आहे़ प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, सारे मंत्री हातात झाडू घेऊन अभियानात चेतना निर्माण करीत आहे; पण उदासिन प्रशासन कागदोपत्री अभियान राबविण्यात धन्यता मानताना दिसते़ आकोली ग्रा़पं़ ने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानात डॉ़ दिपांजली बुधबावरे, मुख्या़ रजनी माथनकर व शिक्षक सहभागी झाले़ ग्रामसेवक रमेश शहारे, परिचारिका बावणे, अंगणवाडी सेविकांनीही सहभाग घेतला़ गावातून विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली़ स्वच्छतेचे नारे देत असताना रस्त्याच्या कडेला घाणीचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या़(वार्ताहर)