शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

८०० विद्यार्थ्यांनी कुंचल्यातून साकारली पर्यावरणाबाबतची सजगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:23 PM

निसर्ग सेवा समितीच्यावतीने आयटीआय टेकडीवर पर्यावरण संरक्षणाकरिता चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्देनिसर्ग सेवा समितीद्वारे चित्र स्पर्धेचे आयोजन : विजेत्यांना पुरस्कार

आॅनलाईन लोकमतवर्धा : निसर्ग सेवा समितीच्यावतीने आयटीआय टेकडीवर पर्यावरण संरक्षणाकरिता चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील एकूण ८०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयानुसार त्यांनी आपल्या कुंचल्यातून पर्यावरणाबाबतची सजगता रेखाटल्याचे दिसून आले. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.म्हाडा कॉलनी जवळील आयटीआय जलशुद्धीकरण केंद्राच्या टेकडीवर १८ वर्षांपुर्वी निसर्ग सेवा समिती द्वारे लावलेल्या वृक्षराजीच्या हिरवळीमध्ये स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलीत व वृक्ष पुजन करून ज्येष्ठ वन्यऋषी मारोती चितमपल्ली, बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक मुरलीकृष्ण राजू, वर्धा विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आशीष गोस्वामी, ओंकार धावडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.उत्कृष्ट स्पर्धकास पुरस्काराचे वितरण मारूती चितमपल्ली, हिंदी विश्व विद्यापीठाचे कुलगुरू गिरीश्वर मिश्र, उपवनसंरक्षक दिगंबर पगार, गांधी विचार परिषदेचे भरत महोदय, बँक आॅफ इंडियाचे मुरलीकृष्ण राजू, मोहन गुजरकर, प्रदीप दाते, चंद्रकला रागीट, विद्यापीठाचे दूरसंचारक विभाग प्रमुख अंकीत राय यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन व समितीच्या कार्याची माहिती समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी प्रास्ताविकातून दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शोभा बेलखोडे, रूपेश रेंगे व रितेश निमसडे यांनी केले.स्पर्धेत महाविद्यालयीन गटात, शासकीय कला महाविद्यालयाचा तुषार राऊत, नितू मेश्राम, न्यू इंग्लिश महाविद्यालयाची अंजली करपाते, न्यू आर्टस्ची ऋतिका बोबडे, पुजा कुबडे यांना पुरस्कृत केले. वर्ग आठ ते दहावीपर्यंतच्या गटात स्कूल आॅफ स्कॉलरचा गोडविन शालन, शासकीय निवासी शाळेचा साहिल भगत, केसरीमल कन्या शळेची तेजस्विनी मरसकोल्हे, न्यू इंग्लिश कॉन्व्हेंटची दिप्ती बावणकर, सावित्रीबाई फुले शाळेची आम्रपाली भगत, वर्ग ५ ते ७ च्या गटात स्कूल आॅफ स्कॉलरची मेधावी मेहत्रे, ओम रघाटाटे, लोक विद्यालयाची तन्वी बकाले, सुशील हिम्मतसिंगकाची ऋतुजा घोटेकर, न्यू इंग्लिश कॉन्व्हेंटची समिक्षा चलाख, वर्ग १ ते ४ गटात वर्ग पहिला सरस्वती विद्यालचा पलक लुटे, महिलाश्रमची रिधीमा शेंडे, सरस्वती विद्यालयाची शोली उसे, केंद्रीय विद्यालयाचा सार्थक ठाकरे, महिलाश्रम बुनियादी संस्कार वाटगुळे, वर्ग दुसऱ्या मधील, अ‍ँन्थोनी शाळेचा सृजल गोपी माटे, अग्रग्रामीचा सोहम आतकरे, शारदा मुकबधिर विद्यालय चैतन्य डुकरे, अग्रगामीची पलक सोनारकर, केंद्रीय विद्यालयाचा अनूप राऊत यांना पुरस्कार मिळाला.तिसºया वर्गातील गटात केंद्रीय विद्यालयाची जानवी उडान, श्रावणी चुटे, शारदा मुक बधिर विद्यालयाची वैष्णवी बावणे, केंद्रीय विद्यालयाची आंशिक कत्रोजवार, शारदा मुक बधिर विद्यालयाची रूतिका लुटे, चवथ्या वर्गाच्या गटात अग्रगामी विद्यालयाचा ओम श्रीस्वामी, बिडीएमचा ओंकार ठाकरे, रमाबाई देशमुख शाळोचा ओम बुचे, केंद्रीय विद्यालयाची आकांशा अजय तायडे, स्कूल आॅफ ब्रिलीयंटची दीक्षा कुंदन यांना स्मृतिचिन्ह, वृक्षरोप, ग्रामगीता, प्रमाणपत्र देवून पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. चित्रांचे परीक्षण राजेराम लांजेवार, मनोज कत्रोजवार, सुनील येनकर, अक्षय मोरे यांनी केले.