जिल्ह्याचे प्रवेशद्वार झोपलेलेच...
By Admin | Updated: November 28, 2015 03:02 IST2015-11-28T03:02:45+5:302015-11-28T03:02:45+5:30
प्रशासन किती जागृत आहे. याचा प्रत्यय वर्धा-नागपूर मार्गावर जिल्ह्याच्या सीमेवर गेल्यावर लक्षात येते.

जिल्ह्याचे प्रवेशद्वार झोपलेलेच...
जिल्ह्याचे प्रवेशद्वार झोपलेलेच... प्रशासन किती जागृत आहे. याचा प्रत्यय वर्धा-नागपूर मार्गावर जिल्ह्याच्या सीमेवर गेल्यावर लक्षात येते. गत काही महिन्यांपूर्वी निर्सगाच्या कोपामुळे नागपूरकडून येताना सेलडोहच्या अलीकडे सुमारे एक कि.मी. अंतरावर असलेले वर्धा जिल्ह्याचे प्रवेशद्वार कोलमडून पडले. यामुळे हा मार्ग प्रभावित झाला होता. तेव्हा हे द्वार सरकवून रस्त्याच्या कडेला असे झोपलेल्या अवस्थेत त्या द्वाराला ठेवण्यात आले. तेव्हापासून त्याकडे कुणी ढुंकूनही बघितले नाही. यावरुन संबंधित विभागासोबत जिल्हा प्रशासनाच्या जागृकतेचा प्रत्यय येतो. प्रवेशद्वाराच्या माध्यमातून जिल्ह्यात येणाऱ्या सर्वप्रकारच्या पाहुण्यांचे स्वागत होत असते; मात्र स्वागताची भूमिका वठवित असलेले द्वारच सध्या प्रशासनाच्या अफलातून कारभाराचा परिचय देत असल्याचे येथून प्रवेश करताना लक्षात आल्यावाचून राहात नाही. रस्त्यांच्या बाबतीतही असेच आहे. उन्हाळा आला की लाखो रुपये खर्चून रस्त्याची मलमपट्टी करण्यात येते अन् पावसाळा सुरू झाला की नेमकी कुठे डागडूजी केली होती हे शोधावे लागते.