शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संगीत मैफिलने रंगला आनंदी कट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 23:36 IST

एकापेक्षा एक सरस गितांनी स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिर आनंदी कट्टाचा विशेष कार्यक्रम पार पडला. गायिका प्रमोदिनी क्षत्रिय यांनी सादर केलेल्या बहारदार गितांमुळे उपस्थितांसह रसिक मंत्रमुग्ध झाले होते.

ठळक मुद्देरसिक मंत्रमुग्ध : प्रमोदिनी क्षत्रिय यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकापेक्षा एक सरस गितांनी स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिर आनंदी कट्टाचा विशेष कार्यक्रम पार पडला. गायिका प्रमोदिनी क्षत्रिय यांनी सादर केलेल्या बहारदार गितांमुळे उपस्थितांसह रसिक मंत्रमुग्ध झाले होते.व्यासपीठावर प्रा. संध्या देशमुख, महावीर पाटणी, प्रा. रोहण कठाणे, धनंजय नाखले आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात जैष्ठ समाजसेवक मुलचंद जैन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. त्यानंतर बाल गायकांनी ‘हे सृष्टीच्या रचनाकारा’ हे संजय इंगळे तिगावकर यांनी लिहिलेले गित सादर केले. तसेच प्रभाकर उघडे लिखित आनंदीकट्टाच्या शिर्षकाचे गीतही सादर करण्यात आले. यानंतर काळाच्या ओघात अंतधान पावलेल्या कलाकांना व कविवर्य स्व. गुरूदेव उरकुडे, कमल वाशिमकर, विमल सोईतकर व जयंत मादुस्कर यांना मावळत्या दिनकरा या गितातून आदरांजली अर्पण करण्यात आली.मोगरा फुलला हे गित सादर करून गायिका प्रमोदिनी क्षत्रिय यांनी मैफलीत उपस्थितांच्या चेहराऱ्यावर आनंद फुलविले. तर लगजा गले, आजारे मै कबसे खडी, आयेगा आनेवाला ही जुनी गिते सादर करून उपस्थितांकडून कौतुकाची थाप मिळवून घेतली. ती गेली तेव्हा रिमझिम, रंजीश ही सही, जीवनात ही घडी, तरुण आहे रात्र अजूनी, वाळवंटातून भीषण वैराण, छोटासा बालमा या भावस्पर्शी गीत त्यांनी यावेळी सादर केली.मैफिलीत त्यांनी एकापेक्षा एक सरस गितांसह गजलही सादर केल्या. हार्मोनियमची साथ अजय हेडाऊ, बंटी चहारे तर तबल्याची साथसंगत आकाश चांदूरकर वासुदेव गोंधळे यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संध्या देशमुख यांनी केले.कार्यक्रमाला प्राचार्य मोनिका रतनपरज, वीरेंद्र भागवतकर, घनश्याम सावळकर, अरुण चवडे, डॉ. बेंदुर, सुधीरचंद्र राईकवार, कृष्णराव मंदुलवार, मनोहर देऊळकर, भीमराव भोयर, शंकर मोहोड, संगीता इंगळे, स्मिता हेडाऊ, शोभा कदम आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेकरिता अरुण चवडे, प्रल्हाद इंगळे, विलास ढुमणे, वासुदेव गोंधळे, विकास गुज्जेवार, ज्योत्स्रा ढुमणे, शेखर देशमुख, शंकर मोहोड आदींनी सहकार्य केले.बालकांसह ज्येष्ठांनी सादर केल्या रचनाकार्यक्रमादरम्यान काही जेष्ठ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. यावेळी डॉ. पुष्पा फाले यांनी मोसे काहे करे रे जोरारोजी, प्रभाकर उघडे यांनी स्वप्नातल्या कळ्यांनी जागेपणी फुलावे तर एक आकाश हळव ही कविता ही सादर केली. काव्य व गितांना संगीत संध्या देशमुख यांनी दिले. तर बाल गायिका अवन्तिका ढुमणे, रीना गायधने तसेच सानिका बोभाटे यांनी त्या आपल्या सुरेल आवाजात गायल्या.

टॅग्स :musicसंगीत