खिलाडू वृत्तीने खेळाचा आनंद घ्या

By Admin | Updated: February 12, 2016 02:37 IST2016-02-12T02:37:40+5:302016-02-12T02:37:40+5:30

दहा वर्षांपासून खंड पडलेल्या क्रीडा स्पर्धेला पुन्हा सुरूवात करण्यात आली. या स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद खिलाडूवृत्तीने घेऊन तन, मनाने स्पर्धांचा आनंद घ्या,....

Enjoy the game with the players | खिलाडू वृत्तीने खेळाचा आनंद घ्या

खिलाडू वृत्तीने खेळाचा आनंद घ्या

संजय मीणा : तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव सुरू
वर्धा : दहा वर्षांपासून खंड पडलेल्या क्रीडा स्पर्धेला पुन्हा सुरूवात करण्यात आली. या स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद खिलाडूवृत्तीने घेऊन तन, मनाने स्पर्धांचा आनंद घ्या, असे आवाहन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा यांनी केले.
जि.प. च्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता क्रीडा संकुलावर तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते. उद्घाटक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल तर अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्यामलता अग्रवाल, जि.प. सदस्य मनोज चांदूरकर, सुनीता ढवळे, हिंगणघाट पं.स. सभापती संजय तपासे, सेलू पं.स. उपसभापती मंजूषा पारिसे, खोडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे आदींसह सर्व विभागांचे प्रमुख, सर्व पं.स. चे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक गोयल यांनीही या स्पर्धा व महोत्सवाचे कौतुक करून आपल्या विविध कौशल्याचा कस खेळातून दिसून येतो. यश, अपयश हे खेळात ठरलेलेच आहे; पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे येथे खेळणारा प्रत्येक जण हा विजेताच आहे. जीवनातही असे प्रसंग येत राहतात. त्यामुळे आलेल्या प्रसंगाला खिलाडूवृत्तीने सामोरे जाऊन गुणांचा विकास स्पर्धांच्या माध्यमातून होण्यास मदत होते, असे सांगितले. जि.प. उपाध्यक्ष कांबळे यांनी या स्पर्धा व महोत्सवाचे कौतुक केले. खेळामुळेच माणूस घडत जातो. खेळाच्या मैदानी प्रकारामुळे तन सदृढ बनते, असेही त्यांनी सांगितले.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. तद्नंतर मैदानाचे पूजन करण्यात आले. मान्यवरांना विविध तालुक्यातील पथकांनी मानवंदना दिली. कार्यक्रमाचे संचालन संजय चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व पं.स. गटविकास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Enjoy the game with the players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.