रन फॉर युनिटीकडे वर्धेकरांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 06:00 AM2019-11-01T06:00:00+5:302019-11-01T06:00:21+5:30

स्थानिक जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हा क्रिडा संकुल स्टेडियमवर सकाळी ७.१५ मिनीटांनी ‘रन फॉर युनिटी’ कार्यक्रमा अंतर्गत एक ता दौडचे आयोजन करण्यात आले होते. इतर जिल्ह्यात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संघटना, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, खेळाडू आणि सर्वसामान्यांना सहभागी करुन घेण्यात आले.

Enhancement Lessons to Run for Unity | रन फॉर युनिटीकडे वर्धेकरांची पाठ

रन फॉर युनिटीकडे वर्धेकरांची पाठ

googlenewsNext
ठळक मुद्देनियोजनाचा अभाव : जिल्हा प्रशासनाची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त ३१ ऑक्टोबर हा दिवस देशभरात ‘रन फॉर युनिटी’ म्हणून साजरा करीत एक ता दौडचे आयोजन केले जाते. मात्र वर्ध्यात जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे वर्धेकरांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे. यामध्ये पोलीस प्रशासन आणि खेळाडूच सहभागी झाले होते. त्यामुळे शासकीय अधिकारी अद्यापही दिवाळीच्या उत्सवातून बाहेर आलेले दिसत नसल्याचे निदर्शनास आले.
स्थानिक जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हा क्रिडा संकुल स्टेडियमवर सकाळी ७.१५ मिनीटांनी ‘रन फॉर युनिटी’ कार्यक्रमा अंतर्गत एक ता दौडचे आयोजन करण्यात आले होते. इतर जिल्ह्यात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संघटना, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, खेळाडू आणि सर्वसामान्यांना सहभागी करुन घेण्यात आले. मात्र वर्ध्यात याच्या विपरीत चित्र पहावयास मिळाले. या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत जनजागृती केली नसल्याने याची माहिती सर्वसामान्य व विविध सामाजिक संघटनांपर्यंत पोहोचू शकली नाही. परिणामी बोटावर मोजण्या इतक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम पार पडला. या दौडमध्ये पोलीस शिपायीच मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावरुन जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून केवळ शासकीय कार्यक्रमाचे सोपस्कार पार पाडले जात असल्याचे क्रीडापे्रमींकडून बोलेले जात आहे.

कार्यक्रमाचे ना निमंत्रण ना माहिती!
जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘रन फॉर युनिटी’ या कार्यक्रमाचे आयोजन करुन यात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन घेण्याकरिता रितसर नियोजन करणे क्रमप्राप्त होते. परंतु दिवाळी साजरी करण्यातच अधिकारी वर्ग खुश असल्यामुळे या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सोबतच अनेक अधिकाऱ्यांना व मान्यवरांना कार्यक्रमाचे निमंत्रण तर सोडा माहितीही दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

मशाल पेटवून झाला कार्यक्रमाला प्रारंभ
या एकता दौड कार्यक्रमादरम्यान क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरिक्षक चौधरी यांनी मशाल पेटवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. ही एकता दौड आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, झाशी राणी चौक मार्गाने जात पोलीस कवायत मैदानावर समारोप करण्यात आला. यावेळी क्रीडा संकुलचे व्यवस्थापक रवि काकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका माने यांची उपस्थिती होती. या दौडमध्ये नेहरु युवा केंद्राचे युवा कार्यकर्ते, खेळाडू व पोलीस शिपाई उपस्थित होते. प्रारंभी दौडमध्ये सहभागी युवक, युवती, खेळाडू व नागरिकांनी एकात्मतेची शपथ घेतली.

Web Title: Enhancement Lessons to Run for Unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.