पोलीस बंदोबस्तात हटले अतिक्रमण

By Admin | Updated: March 25, 2015 01:59 IST2015-03-25T01:59:13+5:302015-03-25T01:59:13+5:30

शहरातील मध्यवस्तीतून निघणाऱ्या महामार्ग क्र. ७ वरील दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम मंगळवारी सुरू करण्यात ....

Encroachment happened in the police station | पोलीस बंदोबस्तात हटले अतिक्रमण

पोलीस बंदोबस्तात हटले अतिक्रमण

हिंगणघाट : शहरातील मध्यवस्तीतून निघणाऱ्या महामार्ग क्र. ७ वरील दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम मंगळवारी सुरू करण्यात आली़ ही मोहीम नॅशनल हायवे अथॉरिटी, नगर पालिका, बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आली़
सकाळी १० वाजता नांदगाव चौकापासून ही मोहीम सुरू करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गलगत रस्त्याच्या कडेला असलेल्या नांदगाव चौकातील सात-आठ दुकानांना उलथवून दूर करण्यात आले. यानंतर अतिक्रमण हटाव पथकाने महामार्गावरील शिवाजी मार्केट, रेल्वे चौकी, पिंपळगाव चौरस्ता या मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण हटविण्यात आले़ अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला. विविध ठिकाणांहून पोलिसांना बोलवून कुमक वाढवून बंदोबस्त ठेवण्यात आला. मंगळवारी महामार्गावरील मोहता बगीचापर्यंत अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली़ बुधवारी शहरातील डॉ. आंबेडकर विद्यालय ते विठोबा चौक परिसरातील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. शहराच्या अन्य भागातील अतिक्रमणही हटविले जाणार असल्याचे सांगण्यात आले़ मंगळवारी दोन जेसीबी, २५ पोलीस कर्मचारी, एक ४०७, ट्रक व अन्य साधनांसह नगर परिषदेचे कर्मचारी, नॅशनल हायवेचे कर्मचारी व अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत मोहीम राबविण्यात आली़(शहर प्रतिनिधी)

Web Title: Encroachment happened in the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.