अंगणवाडी परिसराला अतिक्रमणाचा विळखा
By Admin | Updated: February 18, 2017 01:33 IST2017-02-18T01:33:57+5:302017-02-18T01:33:57+5:30
येथील वॉर्ड नं. २ मध्ये अपूर्ण बांधकाम झालेल्या अंगणवाडी परिसराचा वापर नैसर्गिक विधी उरकण्याकरिता केल्या जात आहे.

अंगणवाडी परिसराला अतिक्रमणाचा विळखा
बांधकाम अपूर्ण : निधीअभावी तीन वर्षांपासून रखडले बांधकाम
रसुलाबाद : येथील वॉर्ड नं. २ मध्ये अपूर्ण बांधकाम झालेल्या अंगणवाडी परिसराचा वापर नैसर्गिक विधी उरकण्याकरिता केल्या जात आहे. याशिवाय ग्रामस्थांकडून येथे अतिक्रमण करण्यात येत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
येथील अंगणवाडीचे बांधकाम तीन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे अंगणवाडीच्या मदतनीस येथे मुलांना बसवायला तयार नाही. लोकप्रतिनिधी यांनी उर्वरीत बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधीची तरतुद करण्याची मागणी होत आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने आजवर लाखो रूपये खर्च केले. मात्र बांधकाम अपूर्ण असल्याने आजवर खर्च केलेला निधी व्यर्थ ठरत आहे. अंगणवाडी इमारतीच्या परिसरात नैसर्गिक विधी उरकले जातात. येथील चबुतऱ्यावर बसून आंबटशौकिन चकाट़्या पिटतात. येथे काही नागरिकांनी शेतीचे अवजारे आणुन ठेवले तर काही येथे लाकडी खांब गाडून जागा बळकवित आहे. हे अतिक्रमण वेळीच रोखणे गरजेचे झाले आहे. याला कुणी विरोध करीत नसल्याने मनमानी सुरू असल्याचे दिसून येते.(वार्ताहर)