युवकांसाठी रोजगार प्रशिक्षण मेळावा

By Admin | Updated: June 3, 2016 02:12 IST2016-06-03T02:12:09+5:302016-06-03T02:12:09+5:30

भारतीय जनता पार्टी जिल्हा शाखेच्या वतीने देवळी येथे एका सभागृहात रोजगार व प्रशिक्षण मेळावा घेण्यात आला.

Employment training rally for youth | युवकांसाठी रोजगार प्रशिक्षण मेळावा

युवकांसाठी रोजगार प्रशिक्षण मेळावा

कमवा व शिका योजनेंतर्गत मार्गदर्शन
देवळी : भारतीय जनता पार्टी जिल्हा शाखेच्या वतीने देवळी येथे एका सभागृहात रोजगार व प्रशिक्षण मेळावा घेण्यात आला. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘कमवा व शिका’ या योजनेमार्फत या मेळाव्यातील बेरोजगार युवकांना आशिष अतकरी यांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी म्हणून खा. रामदास तडस, विदर्भ भाजपाचे संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकार, प्रशांत इंगळे तिगावकर, माजी खासदार विजय मुडे, माधव कोटस्थाने, जि.प. गटनेते किशोर चौधरी, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष जयंत येरावार, चंद्रकांत ठाकरे, वर्धा तालुका अध्यक्ष मनोज तराळे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश वाळके सुनील गफाट, अतुल तराळे, अजिंक्य तांबेकर, वरूण पाठक उपस्थित होते. या रोजगार प्रशिक्षण मेळाव्यात देवळी, पुलगाव परिसरातील दोन हजारच्या वर तरूण बेरोजगार युवक व युवतींनी सहभाग घेतला होता. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांच्या सहकार्याने कार्यक्रम घेण्यात आला.
संचालन जिल्हा संपर्क प्रमुख राहुल चोपडा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद माहुरे, किशोर गव्हारकर, प्रमोद ढोक, विशाल मुडे, प्रवीण आगलावे, गजानन राऊत, गजानन मसराम, गजानन ढगे, संजय बिजवार, स्वप्नील भगत, संजय बिन्नोड, अमोल आगलावे, प्रशांत गयकवाड, पवन जगताप, विशाल कांबळे, आकाश ढोरे, धनंजय झोड, गजानन सुरकार, सागर गेडाम, प्रफुल टिपले, नितेश येंगडे, निलेश कातरकर, सुजर दुगगुडे, शुभम कुरसंगे आदींनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी)

Web Title: Employment training rally for youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.