कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता यादी सत्यप्रत व दुय्यम सेवापुस्तक देणे बंधनकारक

By Admin | Updated: May 14, 2015 01:58 IST2015-05-14T01:58:33+5:302015-05-14T01:58:33+5:30

जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च शाळेतील कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांना दरवर्षी सेवाज्येष्ठता यादीची सत्यप्रत तसेच दुय्यम सेवापुस्तक ...

Employees should be given the list of seniority list and copy of secondary service book | कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता यादी सत्यप्रत व दुय्यम सेवापुस्तक देणे बंधनकारक

कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता यादी सत्यप्रत व दुय्यम सेवापुस्तक देणे बंधनकारक

वर्धा : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च शाळेतील कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांना दरवर्षी सेवाज्येष्ठता यादीची सत्यप्रत तसेच दुय्यम सेवापुस्तक अद्यावत नोंदीकरून देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. असे असताना काही शाळांमध्ये दरवर्षी सेवाज्येष्ठता यादी अद्यावत करून त्यावर त्यांच्या दिनांकीत स्वाक्षऱ्या घेतल्या जात नव्हत्या. यामुळे विमाशीने शिक्षणाधिकारी यांच्याशी केलेल्या चर्चेत निर्णय घेत तशा नोंदी अद्ययावत करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी यांनी केल्याची माहिती विमाशीने पत्रकाद्वारे दिली आहे.
नियमावलीतील तरतूदी व शासन निर्णयानुसार आस्थापनेवरील मान्यता प्राप्त कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची दरवर्षी मार्च अखेर किंवा डिसेंबर अखेर अद्ययावत सेवाज्येष्ठता यादी तयार करून त्यावर त्यांच्या दिनांकीत स्वाक्षऱ्या घेवून त्याची प्रत संबंधितांना देणे तसेच मूळ सेवापुस्तकावरून नोंदी अद्ययावत करून दुय्यम सेवापुस्तक अद्यावत नोंदी करून मिळाल्याची पोच देणे बंधनकारक आहे.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने वेळोवेळी शिक्षणाधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये सदर विषयाबाबत चर्चा घडवून आणली. त्याचीच प्राप्ती म्हणून शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी परिपत्रक काढून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करून त्यावर संबंधितांच्या स्वाक्षऱ्या घेत दुय्यम सेवापुस्तकातील नोंदी अद्ययावत करून त्याची पोच आॅगस्ट २०१५ च्या वेतनदेयकासोबत वेतन पथकाला सादर करण्याचे निर्देश दिले आहे. अन्यथा आॅगस्ट व त्यापुढील वेतन देयके स्कीकारण्यात येणार नाही असेही कळविले आहे.

Web Title: Employees should be given the list of seniority list and copy of secondary service book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.