शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कर्मचाऱ्यांना कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:53 IST

पिण्याच्या पाण्याची समस्या व विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी माया ठवरी याच्या नेतृत्वात मंगळवारी नगर पंचायत कार्यालयात मोर्चा आणून ठिय्या दिला.

ठळक मुद्देपाण्याकरिता महिला आक्रमक : समुद्रपूर न.पं.तील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : पिण्याच्या पाण्याची समस्या व विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी माया ठवरी याच्या नेतृत्वात मंगळवारी नगर पंचायत कार्यालयात मोर्चा आणून ठिय्या दिला. यावेळी नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. नागरिकांनी दिलेले आश्वासन लिखित मागितले असता अधिकाºयांनी त्याना विरोध दर्शविला. यामुळे संतप्त नागरिकांनी नगर पंचायतीच्या मुख्य फाटकाला कुलूप ठोकले. यामुळे येथील कर्मचारी आणि अधिकारी सायंकाळपर्यंत आतच होते.भालकर वॉर्ड क्र. २ येथील नागरिकांनी गत २० वर्षांपूर्वी नळ योजनेची मागणी केली होती. असे असताना त्यांना अद्यापही नळ जोडणी मिळाली नाही. या वॉर्डात पिण्याच्या पाण्याची समस्या असून नगर पंचायतीचे दुर्लक्ष आहे. या वॉर्डातील प्रतिष्ठीत नागरिकांनी पैशाच्या जोरावर घर टॅक्स लावून घेतले; पण गोरगरीब मजुरांना इमला कर लावून पावती हातात दिली जाते. आम्हाला इमला कर न लावता घरटॅक्सची पावती देण्यात यावी, मटण मार्केटचे स्थलांतर करण्यात यावे, तसेच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करीत नागरिक नगर पंचायतीवर धडकले.महिला पुरूषांनी नगर पंचायतीत ठिय्या दिल्याने नगर पंचायतच्या मासिक सभेत मागणी करताना डॉ. ना.ना. बेहरे यांच्या दुकानापासून नवीन व्हॉल्व्ह बसवून नवीन पाईप लाईन टाकू, असे एकमताने ठरविले. त्यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्ष शीला सोनारे, माजी पाणी पुरवठा सभापती गजानन राऊत, नगर सेवक दिनेश निखाडे यांनी पुढाकार घेतला. वृत्त लिहिस्तोवर आंदोलन सुरूच होते. फाटक बंद असल्याने कर्मचाºयांची तारांबळ उडाली होती. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने आंदोलकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांच्या मध्यस्थीलाही या आंदोलकांनी साथ दिली नसल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.या मोर्चात समाजसेविका मंदा ठवरी, नगरसेवक पंकज बेलेकर, सोनू मेश्राम, अखिल रामटेके, राष्ट्रपाल कांबळे, शिला बेलेकर, उर्मिला सोमकुंवर निर्मला ताकसांडे, मनिषा झुंगरे, करुणा अलोणे, पुष्पा मुरसे, मनीषा मसराम, नानी डुमार, मंदा गजभिये, प्रीती शेंडे, जिजा पाटील, शारदा डोंगरे, कमला कोसे, विजू रामटेके, ललिता लोखंडे, किरण गजभिये इत्यादीसह शंभरावर नागरिक सहभागी होते.२१ आंदोलकांवर गुन्हा दाखल व अटकनगर पंचायतीत आंदोलनादरम्यान मिळालेले आश्वासन लिखित स्वरूपात देण्याच्या मागणीकरिता कार्यालयाच्या फाटकाला कुलूप ठोकण्यात आले. या प्रकरणी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली. या तक्रारीवरून ठाणेदार मुंढे यांनी २१ आंदोलकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या आंदोलकांवर कार्यवाही झाल्यानंतरच नगर पंचायतीच्या फाटकाचे कुलूप काढण्यात आले. त्यानंतरच येथील कर्मचाºयांना बाहेर पडणे शक्य झाले.