कर्मचाऱ्यांनीच लावला मालकाला चुना

By Admin | Updated: November 13, 2014 23:06 IST2014-11-13T23:06:57+5:302014-11-13T23:06:57+5:30

पेट्रोल व डिझेलची अतिरिक्त विक्री करून नोंदणीवहित चुकीची नोंद करून कर्मचाऱ्यांनी पुलगाव येथील पेट्रोल पंप चालकाला चुना लावला़ याबाबत मालकाने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून चार

Employees chose the owner | कर्मचाऱ्यांनीच लावला मालकाला चुना

कर्मचाऱ्यांनीच लावला मालकाला चुना

वर्धा : पेट्रोल व डिझेलची अतिरिक्त विक्री करून नोंदणीवहित चुकीची नोंद करून कर्मचाऱ्यांनी पुलगाव येथील पेट्रोल पंप चालकाला चुना लावला़ याबाबत मालकाने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून चार कर्मचाऱ्यांविरूद्ध विश्वासघात केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आला़
पुलगाव नजीकच्या संकटमोचन पेट्रोल पंपाचे मालक सुनील ब्राम्हणकर यांनी पुलगाव पोलिसात गुरुवारी तक्रार दिली़ तक्रारीवरून विनायक ढुमणे, बंटी चुटे, कुंदन ठवरे व कृणाल कांबळे या चौघांवर भादंविच्या कलम ४०६ गुन्हा दाखल करण्यात आला़
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर चौघेजण संकटमोचन पेट्रोलपंपावर कर्मचारी म्हणून कार्यरत होते़ या काळात चारही जणांनी संगनमत करून डिझेल व पेट्रोलची अतिरिक्त विक्री केली़ तसेच नोंदणीवहित चुकीची नोंद करून आर्थिक अपहार केला़ काही नोंदणीत खोडतोड करून बनावट आकडेवारी टाकली़ ग्राहकांना जास्त प्रमाणात विक्री करून प्रत्यक्षात व नोंदणीत तफावत असल्याची बाब ब्राम्हणकर यांच्या लक्षात येताच त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारणा केली़ यावेळी चौघांनी ग्राहकांकडून अधिकचे पैसे घेत नोंदणीवहित खाडाखोड केल्याचे लक्षात आले़ चारही जणांनी २ नोव्हेंबरपासून कामावर जाणे बंद केले़ अखेर ब्राम्हणकर यांनी घटनेची तक्रार पोलिसात दिली़(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Employees chose the owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.