शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन योजना : संपकऱ्यांनी भारुडातून मारला शासनाला डंख; भजन, गीतांनी वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 11:22 IST

चौथ्या दिवशीही उत्साह कायम

वर्धा : ‘अरं रं रं...विंचू चावला... एनपीएसचा विंचू चावला... काय मी करू विंचू चावला...’ असे भारुड म्हणत संपकऱ्यांनी अनेकांचे लक्षवेधत शासनाला चांगलाच डंख मारला. यावेळी अनेक भजने, गीत सादर करून आंदोलकांमध्ये स्फूर्ती भरण्यात आली. त्यामुळे आज चौथ्या दिवशीही संपकऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचे दिवसभर ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान आज कर्मचाऱ्यांचे कलागुण अनुभवायला मिळाले. संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनी विविध स्फूर्ती गीत व जनजागृती गीत सादर करून आंदोलनस्थळी उत्साह वाढविला. यावेळी ढोलकी, डफडीच्या साथीने टाळ्यांचा कडकडाट करून कर्मचाऱ्यांनी ठेकाही धरला. यात पुरुष कर्मचाऱ्यांच्या बरोबरीनेच महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. आपल्या भारुड, भजन व गीताच्या माध्यमातून ‘एकच मिशन जुनी पेन्शन’चा नारा बुलंद करण्यात आला. यासर्व कार्यक्रमांमुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत आंदोलकांची चांगलीच गर्दी होती.

संपात वाढतोय कर्मचाऱ्यांचा सहभाग

जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी १४ मार्चपासून संपावर गेले आहेत. वर्ध्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकासह इतरही तालुक्यामध्ये ठिय्या आंदोलन करीत आहे. गेल्या तीन दिवसांचा अंदाज घेतला असता कर्मचाऱ्यांचा सहभाग दिवसेंदिवस वाढतच आहे. या संपात ७० संघटनांचा सहभाग असून आज वर्ध्यात जवळपास ११ हजार कर्मचारी उपस्थित होते. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार असल्याचे अध्यक्ष हरिशचंद्र लोखंडे यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपEmployeeकर्मचारीPensionनिवृत्ती वेतनGovernmentसरकारwardha-acवर्धा