शहर ठाणेदारामुळे कर्मचारी मानसिक दडपणात ?
By Admin | Updated: November 8, 2015 02:12 IST2015-11-08T02:12:12+5:302015-11-08T02:12:12+5:30
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे पोलिसांच्या आत्महत्यांनी गृहविभाग हादरला असताना वर्धा शहर ठाण्यातही काही कर्मचाऱ्यांच्या ...

शहर ठाणेदारामुळे कर्मचारी मानसिक दडपणात ?
निनावी पत्राने खळबळ : पत्रातून आत्महत्या वा अनुचित प्रकाराची भीती
वर्धा : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे पोलिसांच्या आत्महत्यांनी गृहविभाग हादरला असताना वर्धा शहर ठाण्यातही काही कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्याने ठाणेदार काम करीत असलेल्या मजकूराचे निनावी पत्र ‘लोकमत’कडे आलेले आहे. या खळबळजनक पत्रात ठाणेदारांचे आर्थिक व्यवहार हे कर्मचारी सांभाळत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, यावर लगाम लागला नाही तर आत्महत्या वा अनुचित प्रकार घडण्याची भीतीही वर्तविली आहे.
ठाणेदार एम.पी बुराडे गत दोन-तीन वर्षांपासून या ठाण्याचा कारभार सांभाळत आहे. या कार्यकाळात कर्मचाऱ्यांचा मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचे म्हटले आहे.
वसुलीसाठी काहींना मोकळे रान
शहर ठाण्यात कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या मनमर्जीने लावण्यात येत आहे. वसुलीसाठी काही कर्मचाऱ्यांना मोकळे सोडले आहे.ही मंडळी कर्तव्य सोडून ठाणेदाराने दिलेली जबाबदारी तेवढ्याच आवडीने करताना दिसून येते.
एटीएमचोर अद्यापही मोकाटच
शहरात गत दोन दिवसांपूर्वी एटीएम फोडण्यात आल्याने शहरात मोठ्या प्रमाणात दशहत पसरली आहे. या चोरट्यांना पकडणे अद्याप पोलिसांना शक्य झाले नाही. ऐन दिवाळसणाच्या दिवसात झालेल्या चोऱ्यांमुळे सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.