शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
2
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
3
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
4
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
5
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
6
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
7
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
8
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
9
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
10
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?
11
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
12
GSTच्या नव्या बदलांमुळे IPL 2026ची तिकीटे महागणार; पाहा किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?
13
कोकणात भाजप-शिंदेसेनेत फोडाफोडी? कुडाळमध्ये नगराध्यक्षासह ६ नगरसेवकांचं भाजपामधून निलंबन 
14
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
15
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
16
GST On Cars: दिवाळीत कार खरेदी करणाऱ्यांना गिफ्ट; GST कपातीमुळे कोणती कार घेणं ठरणार फायदेशीर?
17
GST परिषदेच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण! तुमच्या शहरतील आजचे ताजे भाव काय?
18
Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
19
Ajit Pawar: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका
20
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त

कंटेन्मेंट झोनमध्ये विद्युत चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

परिसरातील नागरिकांवर १४ दिवस वॉच ठेवण्याकरिता पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासाठी तेथे मंडप उभारण्यात आले. या मंडपाकरिता लगतच्या विद्युत खांबावरुन डायरेक्ट विद्युत पुरवठा घेण्यात आल्याने महावितरणकडून कारवाई करीत गोंड प्लॉट, मालगुजारीपुरा तसेच गांधी नगर येथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.

ठळक मुद्दे कनेक्शन कापले : महावितरणच्या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मंडप उभारण्यात आले आहे. या मंडपाकरिता महावितरणकडून कोणतीही परवानगी न घेता थेट विद्युत पुरवठा घेतल्याचे निदर्शनास आल्याने महावितरणकडून शहरातील तीन ठकाणचा विद्युत पुरवठा खंडीत केला. या कारवाईमुळे प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाल्यानी इतर ठिकाणच्या कारवाईला ब्रेक लागला.शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून रुग्ण आढळून आलेला परिसर प्रतिबंधित केला जात आहे. त्या परिसरातील नागरिकांवर १४ दिवस वॉच ठेवण्याकरिता पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासाठी तेथे मंडप उभारण्यात आले. या मंडपाकरिता लगतच्या विद्युत खांबावरुन डायरेक्ट विद्युत पुरवठा घेण्यात आल्याने महावितरणकडून कारवाई करीत गोंड प्लॉट, मालगुजारीपुरा तसेच गांधी नगर येथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. शहरातील मालगुजारीपुरा हा परिसर कंटेन्मेट झोन जाहीर केला असून या परिसरात महावितरणचे एक अधिकारी वास्तव्यास आहे. त्यांनाही १४ दिवस बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. यामुळे दुखावलेल्या या अधिकाऱ्यांची दृष्टी या अनधिकृत कनेक्शन पडल्याने त्यांनी विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे आदेश दिल्याची चर्चा मालगुजारीपुरा परिसरात रंगली आहे. त्यानंतर शहरातील इतरही ठिकाणी कारवाईला सुरुवात केली होती पण, ही कारवाई चर्चेचा विषय ठरल्यानंतर कारवाईला थांबा देण्यात आला. त्यामुळे ही कारवाई केवळ ‘अधिकारशाही’तून झाल्याची चर्चा आहे. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधला असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. पालिकेने डिमांड भरून या परिसरात विद्युत पुरवठा सुरू केला आहे.

कंटेन्मेट झोनची जबाबदारी शहरीभागात नगरपालिका तर ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली आहे. त्यामुळे शहरातील विद्युत कनेक्शनबाबत काय प्रकार घडला याची माहिती मागविली आहे. तसेच आता कंटेन्मेंट झोन जाहीर झाल्यानंतर त्या परिसरात महावितरणने चार तासांत विद्युत पुरवठा करावा, असा आदेश पारित केला जाईल.- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.

टॅग्स :electricityवीजtheftचोरी