विद्युत जनित्राचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:58 IST2019-04-29T22:58:40+5:302019-04-29T22:58:57+5:30
शहरातील शिवाजी चौक ते आर्वी नाका मार्गावर सुभेदार मंगल कार्यालयाच्या बाजुला असलेल्या विद्युत जनित्राने अचानक पेट घेतला. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजतादरम्यान घडली. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. काही काळ या परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.

विद्युत जनित्राचा भडका
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील शिवाजी चौक ते आर्वी नाका मार्गावर सुभेदार मंगल कार्यालयाच्या बाजुला असलेल्या विद्युत जनित्राने अचानक पेट घेतला. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजतादरम्यान घडली. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. काही काळ या परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने त्याचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. आज दुपारी सुर्य तळपत असतानाच सभेदार मंगल कार्यालयाच्या बाजुला असलेल्या विद्युत जनित्राचा अचानक भडका उडाला. त्यामुळे परिसरात धावपळ सुरु झाली. सघर्ष वाहन चालक-मालक संघटनेचे विदर्भ कार्याध्यक्ष राहुल हाडके यांनी लगेच बोरगाव (मेघे) येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाला सूचना दिली. माहिती मिळताच अवघ्या दहा मिनिटात महावितरण कार्यालयात कर्तव्यावर असलेले संतोष उमाटे, अरुण फुटाणे, दीपक पेटकर, अनुराग मराठे आदींसह राजू गावंडे, पिंटू वरखडे, योगेश खेडकर, प्रवीण मुडे, राहुल भालेराव यांनी रस्त्याच्या कामासाठी असलेली गिट्टीची चुरी टाकून विद्युत जनित्राची आग विझविली. तापमानाचा पारा ४५ अंशााचा वर गेला आहे. तसेच विजेचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जनित्रावर दाब वाढल्याने आग लागली असल्याची शक्यता आहे.