निवडणूक विभाग इंटरनेटवर माघारलेलाच

By Admin | Updated: October 9, 2016 00:31 IST2016-10-09T00:31:45+5:302016-10-09T00:31:45+5:30

शासनाचे अर्धे अधिक काम आॅनलाईन होत असताना निवडणूक विभाग मात्र या कामात माघारलेला असल्याचे दिसून आले आहे.

The Election Department has not withdrawn the Internet | निवडणूक विभाग इंटरनेटवर माघारलेलाच

निवडणूक विभाग इंटरनेटवर माघारलेलाच

तीन वर्षांपासून यादी बदललीच नाही : नागरिकांना माहिती मिळणे कठीण 
रूपेश मस्के कारंजा (घा.)
शासनाचे अर्धे अधिक काम आॅनलाईन होत असताना निवडणूक विभाग मात्र या कामात माघारलेला असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याच्या संकेत स्थळावर जिल्ह्याच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांची जुनीच यादी कायम असल्याने नागरिकांना कोणाशी संपर्क साधावा, असा प्रश्न पडला आहे. सध्या मतदार यादी अपडेट करण्याचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांच्या या जुन्या यादीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
डीजीटल इंडीयाचा सर्वत्र गाजावाजा होत आहे. अनेक विभाग आॅनलाईन होत आहे. दिवसागणिक नागरिकांना सर्वच सेवा आॅनलाईन देण्याच्या बाता शासनाकडून करण्यात येत आहे. सध्या राज्यात जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहे. यात निवडणूक विभागाकडून नव्या याद्या तयार करण्याचे व नव्या मतदारांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात नागरिकांना शासनाकडून योग्य माहिती मिळावी, याकरिता त्यांच्याकडून इंटरनेटचा वापर करून आपल्या विभागाचा अधिकारी कोण, याचा शोध घेत माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. येथे मात्र जुनेच अधिकारी कार्यरत असल्याने त्यांना माहिती मिळणे कठीण जात आहे.
यादीत असलेल्या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधला असता तो चुकीचा असल्याचे दिसून आले. ही यादी एक दोन नाहीत तर तब्बल तीन वर्षांपासून ‘अपडेट’ झाली नसल्याचे दिसून आले. यामुळे निवडणूक विभाग त्यांच्या कामासंदर्भात किती सतर्क आहे, याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. सध्या नविन मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू आहे. यामुळे अशा चुका निवडणूक विभागाने दुरुस्त कराव्या अशी जनसामान्यांची मागणी आहे. तेव्हा याकडे संबंधीत विभागाने अद्यावत माहितीच्या दृष्टिने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

आॅनलाईन अर्जाद्वारे मतदार नोंदणी
निवडणूक विभागाव्दारे आॅनलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे. यात युवकांना स्वत: इंटरनेटच्या सहाय्याने नवीन मतदार नोंदणी अथवा तत्सम प्रकारच्या सेवा आॅनलाईन अर्जाव्दारे घेता येते. याचा बऱ्याच अंशी नागरिकांना फायदाही होत आहे; परंतु काही अडचणी किंवा शंका अथवा माहिती पाहिजे असल्यास किंवा जिल्ह्यानुसार जिल्हा संपर्क यादीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावयाचा असल्यास निवडणूक आयोगाच्या वेबसाईडवर जावून क्लीक केल्यानंतर जिल्हा संपर्क यादी येते. या यादीतील कार्यालयाच्या क्रमांकाव्यातिरिक्त एकही क्रमांक अपडेट केला नसल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे ईतरही सेवा अपडेट आहे अथवा नाही याबाबत शंका निर्माण होत आहे.

जिल्ह्यात निवडणुकीचे वारे
जिल्ह्यातच नाही तर राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. यामुळे निवडणूक विभागाच्यावतीने नवीन मतदार नोंदणी सुरू आहे. शिवाय विविध कामांची माहिती नागरिकांना मिळावी, याकरिता इंटरनेटवर ती टाकण्यात येत आहे. आजच्या युगात सर्वत्र स्मार्ट फोन असल्याने नागरिकांना कोणतीही माहिती एका क्लिकवर पाहिजे आहे. यातच नागरिकांकडून निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर भेट देतात; मात्र त्यांना पाहिजे असलेली माहिती मिळत नाही. यामुळे निवडणूक विभागाने ही यादी अपडेट करण्याची गरज वर्तविण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी आऊट आॅफ कव्हरेज एरिया
या संदर्भात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना विचारणा करण्याकरिता त्यांचा भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तो आऊट आॅफ कव्हरेज एरिया दाखवित होता.

ही बाब खरी असेलही. पण ती तालुका नाही तर जिल्हा स्तरावर पूर्ण केली जाते. यामुळे या संदर्भात काहीच बोलू शकत नाही.
-सुरेश मडावी, तहसीलदार, कारंजा (घाडगे)

Web Title: The Election Department has not withdrawn the Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.