‘सा विद्या या विमुक्तये’ या उक्तीप्रमाणे शिक्षण असावे

By Admin | Updated: March 5, 2016 02:19 IST2016-03-05T02:19:24+5:302016-03-05T02:19:24+5:30

महात्मा गांधी यांनी वर्धा शिक्षण परिषदेत १९३७ मध्ये मांडलेल्या विचारांची दिशा घेऊन मनुबुद्धी, शरीर आणि हृदयाचे (आत्मिक) सर्वांगिण शिक्षणाचे विकासाचे शिक्षण ...

Education should be according to the meaning of 'Vidya Vidya' | ‘सा विद्या या विमुक्तये’ या उक्तीप्रमाणे शिक्षण असावे

‘सा विद्या या विमुक्तये’ या उक्तीप्रमाणे शिक्षण असावे

सेवाग्राम आश्रमातील राष्ट्रीय चर्चासत्रात ठराव : विविध राज्यातील तज्ज्ञांचा सहभाग
सेवाग्राम : महात्मा गांधी यांनी वर्धा शिक्षण परिषदेत १९३७ मध्ये मांडलेल्या विचारांची दिशा घेऊन मनुबुद्धी, शरीर आणि हृदयाचे (आत्मिक) सर्वांगिण शिक्षणाचे विकासाचे शिक्षण सर्व घटकांना मिळावे यादृष्टीने ही संरचना करण्यात आली. महात्मा गांधीच्या हस्ते उद्योगाच्या माध्यमातून मानवी व्यक्तीगत व सामूहिक जीवन शिक्षण मिळावे याकरिता उपनिषेधातील ‘सा विद्या या विमुक्तये’ या उक्ती प्रमाणे सर्वांना मुक्तीकरिता योग्य बनविता येईल, अशी विद्या असलेले शिक्षण असावे, असा ठराव सेवाग्राम आश्रमात आयोजित दोन दिवसीय चर्चासत्रात घेण्यात आला.
नई तालीमच्या शिक्षण पद्धतीवर आधारित वैकल्पिक शिक्षणाच्या धोरणाचा मसुदा तयार करण्याकरिता सेवाग्राम आश्रमातील नई तालीम समिती येथे दोन दिवसाच्या राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले. संमेलनाची सुरुवात आनंद निकेतनच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या गांधी रचित ‘हे नम्रता के सागर...’ या गीतांनी झाली. यावेळी आनंद निकेतनच्या विद्यार्थ्यांनी रोप मलखांबचे प्रात्यक्षिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
या चर्चासत्रात मध्य प्रदेश माजी मुख्य सचिव व भारतीय स्टाफ अकादमीचे प्राचार्य शरदचंद्र बेहर, जन आंदोलनाचे आणि आदिवासींच्या जल जंगल जमिनीच्या हक्काकरिता लढणारे पी.व्ही. राजगोपाल यांची उपस्थिती होती. डॉ. बेहर यांनी, संविधानाच्या चौकटीत राहूनच अहिंसक समाजाकरिता, नई तालिमच्या शिक्षण पद्धतीनेच निर्मिती करता येवू शकते, असे विचार व्यक्त केले. राजगोपाल यांनी ‘काम आणि ज्ञान याची सांगड घालणारे शिक्षण सर्वांगिण विकासाकरिता महत्त्वाचे आहे. इतकेच नव्हे! तर शिक्षण हे मानवाचे जीवन निर्धारित करते, असे विचार व्यक्त केले. डॉ. सुगन बरंठ यांनी शिक्षणाच्या पर्यायी धोरणाची का गरज निर्माण झाली, याबाबत विचार व्यक्त केले.
या संमेलनाला १२ राज्यातील १३६ सदस्यांसह भारतात समाजकार्याचे कार्य करणाऱ्या तीन विदेशी विद्यार्थ्यांची उपस्थित होती. गटागटाने झालेल्या चर्चेत शिक्षणाची भूमिका व प्रस्ताविक डॉ. सुधाकर (आंध्रप्रदेश), शिक्षणाची उद्दीष्टे आणि मुलभूत शिक्षण-प्रभाकर व डॉ. जिल (टीएन), शिक्षणाचे माध्यम व संस्थागत संरचना-आनंद कुमार (तेलंगना) उषारणी, सुषमा, शिक्षक व प्रशिक्षण-मोना पात्रोत (एमएस) बिश्वजीत (प. बंगाल), मीनाक्षी (ता.नाडू) असेसमेंट व मुल्यांकन डॉ. विवेक वाघ, सुबोध व धनंजय कुमार (यूपी), सामाजिक व सरकारी सहभागीता राजगोपाल (दिल्ली), प्रा. सीमा पुसदकर, डॉ. प्रसाद (एपी), मोहन हिरालाल यांनी भूमिका मांडल्या.

संमेलनात झालेले ठराव
नई तालीमच्या तत्वावर वैकल्पिक व पर्यायी शिक्षण धोरणाचा मसुदा बनवून तो प्रत्यक्ष समितीकडे सादर करावा (याकरिता नव शिक्षण धोरणाच्या मसुदा, न्यू एज्युकेशन पॉलीसी) समितीचे सदस्य प्रो. शरदचंद्र बेहर यांचे सहकार्य घेण्यात यावे.
व्यापक प्रमाणावर शिक्षण धोरणाबाबत प्रसार-प्रचार आणि जागृती करण्यात यावी. याकरिता राज्यनिहाय संमेलन घेण्यात यावी.
शिक्षांतील दावे-प्रतिदावे आणि शिक्षणाला पर्याय म्हणून फक्त कौशल विकास होत असेल तर त्याबाबत सचेत करावे.
ज्ञान व अनुभव आधारित, (३ एच-हार्ट, हॅन्ड अ‍ॅन्ड हेड) हृदय, हात आणि बुद्धीच्या सर्वांगिण विकासावर आधारित नई तालीमच्या शिक्षण पद्धतीच्या अनुषंगाने शाश्वत समाजाच्या शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करावे.
जीविकेकरिता नाही तर जीवनाकरिता कृतीतून आणि प्रत्यक्ष अनुभवजन्य शिक्षण मिळावे याकरिता शिक्षण व्यवस्था करावी.

Web Title: Education should be according to the meaning of 'Vidya Vidya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.