ऩप़ चे शिक्षण; ११ शाळांवर १० लाखांचा खर्च
By Admin | Updated: February 4, 2015 23:19 IST2015-02-04T23:19:10+5:302015-02-04T23:19:10+5:30
खासगी संस्थांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद आणि नगर परिषद शाळांना अखेरची घरघर लागली आहे़ वर्धा शहरात पालिकेच्या ११ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आणि एक हायस्कूल आहे़

ऩप़ चे शिक्षण; ११ शाळांवर १० लाखांचा खर्च
प्रशांत हेलोंडे - वर्धा
खासगी संस्थांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद आणि नगर परिषद शाळांना अखेरची घरघर लागली आहे़ वर्धा शहरात पालिकेच्या ११ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आणि एक हायस्कूल आहे़ यातील ११ शाळांवर शासनाचे १० लाख रुपये खर्च होत आहे़ एकाही शाळेत पटसंख्या समाधानकारक नसून एका शाळेत तर केवळ १८ विद्यार्थ्यांवर ३५ हजार रुपयांचा खर्च होत आहे़
वर्धा नगर परिषदेच्या शहरात ११ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत़ या शाळांची एकूण पटसंख्या ७१३ असून २९ शिक्षक कार्यरत आहेत़ या शिक्षकांवर महिन्याकाठी शासनाचा १० लाख ३७ हजार २७ रुपये खर्च होत आहे़ यातील १ लाख ५४ हजार ९८९ रुपयांची कपात होऊन ८ लाख ८२ हजार ३८ रुपये निव्वळ खर्च होत असल्याची माहिती पालिकेने माहिती अधिकारात दिली. हा खर्च केवळ वेतन आणि भत्त्यांवर होणारा आहे़ शाळेच्या देखभाल, दुरूस्ती, शैक्षणिक साहित्य व अन्य विषयांवर होणारा खर्च वेगळाच. यातील काही खर्च पालिकेला मिळणाऱ्या शिक्षण करातून तर काही खर्च सर्व शिक्षा अभियानातून जिल्हा परिषदेद्वारे केला जातो़ एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना शाळेतील गुणवत्ता सुधारत नसल्याने विद्यार्थीसंख्या कमी होत आहे़ पालिकेच्या स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेत तर केवळ १८ विद्यार्थी आहेत़ यातील इयत्ता पहिलीमध्ये तीन, इयत्ता दुसरीत तीन, तिसरीमध्ये १० तर चवथ्या वर्गामध्ये केवळ सहा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ या १८ विद्यार्थ्यांसाठी २ शिक्षक कार्यरत असून त्यांच्यावर ३५ हजार ५५४ रुपये खर्च होत आहे़ सर्वाधिक १९५ ही पटसंख्या शिवाजी उच्च प्राथमिक शाळेत असून तेथे सहा शिक्षक कार्यरत आहेत़ या शाळेवर वेतनाचा खर्च १ लाख ९६ हजार ४८२ रुपये होत आहे़ २७ शिक्षक आणि २ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर एकूण १० लाख रुपयांचा खर्च होत असताना नगर परिषदांच्या शाळांतील शैक्षणिक दर्जा सुधारताना दिसत नाही़