सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंता मेळावा
By Admin | Updated: August 7, 2016 00:29 IST2016-08-07T00:29:25+5:302016-08-07T00:29:25+5:30
येथील म.रा.वि.वि. कंपनीच्या लघु प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र शासनाची योजना राबविण्याकरिता सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंता मेळाव्याला ...

सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंता मेळावा
सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंता मेळावा
वर्धा : येथील म.रा.वि.वि. कंपनीच्या लघु प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र शासनाची योजना राबविण्याकरिता सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंता मेळाव्याला चाळीस पदवी आणि पदविकाधारक विद्युत अभियत्यांनी सहभाग नोंदविला.
सदर मेळाव्यात मार्गदर्शक म्हणून वर्धा मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार रामदास तडस उपस्थिता होते. या योजनेचा लाभ घेवून बेरोजगार विद्युत अभियंत्यांनी स्वबळावर व्यवसाय सुरू करून इतरांसाठी रोजगार निर्मिती करण्याचे आवाहन देशपांडे यांनी केले.
सदर मेळाव्यात प्रथमत: महावितरण कंपनीतर्फे योजनेचे महत्व सांगत बेरोजगार विद्युत अभियत्यांना थेट लॉटरी पद्धतीने कामे देणार असल्याची विस्तृत माहिती देण्यात आली. प्रथम वर्षात १० लाख रूपयापर्यंत किमतीची मर्यादा असेल. त्यानंतर ४० लाख रूपये पर्यंतची कामे अशी एकूण ५० लक्ष रूपयांची कामे निश्चित केलेली आहे. दुसऱ्या वर्षी १५ लाखांपर्यंतची कामे थेट लॉटरी पध्दतीने तर वार्षिक कामे एकूण ७५ लाखांपर्यंतची कामे देण्यात येतील. सदर मेळाव्यात काम देण्याबाबतचे निकष, विद्युत अभियंता नोंदणी कार्यपद्धती, योजनेंतर्गत द्यावयाच्या कामाचा तपशिल, योजनेची कार्यपद्धती वाटपाची रूपरेषा यांचे प्रेझेंटेशन देण्यात आले. उपस्थितांच्या विविध शकांचे निरसनही यावेळी करण्यात आले.
सदर कामे घेण्यासाठी विद्युत कंत्राटदार अनुज्ञाप्ती व नोंदणी करणे आवश्यक असल्याने या बाबत वर्धा जिल्ह्याचे विद्युत निरीक्षक भोयर यांनी मार्गदर्शन केले.अधिकारी चांडक यांनीही माहिती दिली. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी वर्धा आर्वी, हिंगणघाट, विभागातील कर्मचारी, अभियंते, विद्युत निरिक्षक कार्यालय वर्धा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.(शहर प्रतिनिधी)