बालवैज्ञानिकांनी साकारल्या पर्यावरणपूरक प्रतिकृती

By Admin | Updated: January 6, 2015 23:07 IST2015-01-06T23:07:04+5:302015-01-06T23:07:04+5:30

स्थानिक निर्मल इंग्लिश स्कूल येथे विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. वामन गायधने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. निलेश पांढरे, अविनाश गोहाड, वसंत उपाध्ये, मेघना भट्ट आदी

Eco-friendly replicas produced by the child scientists | बालवैज्ञानिकांनी साकारल्या पर्यावरणपूरक प्रतिकृती

बालवैज्ञानिकांनी साकारल्या पर्यावरणपूरक प्रतिकृती

आर्वी : स्थानिक निर्मल इंग्लिश स्कूल येथे विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. वामन गायधने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. निलेश पांढरे, अविनाश गोहाड, वसंत उपाध्ये, मेघना भट्ट आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पांढरे यांनी शालेय विद्यार्थ्यांतील जिज्ञास वृत्ती जोपासण्याकरिता विज्ञान प्रदर्शन आवस्यक असयाचे मत व्यक्त केले. प्रा. गायधने यांनी वैज्ञानिक दृष्टीकोण व विद्यार्थ्यांची जडणघडण यावर मार्गदर्शन केले. यासह उपस्थित मान्यवरांनी समायोचित विचार व्यक्त केले. विज्ञान प्रदर्शनात तारांगण, सिंपल मशीन, वाटर हार्वेस्टिंग सिस्टम, पिन होल कॅमेरा यावर उपकरणे सादर केले. यावेळी क्राफ्ट प्रदर्शनाचेही मान्यवरांनी अवलोकन केले. यावेळी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार रागिनी राऊत यांनी केले. आयोजनाला संजय वाघमारे, स्नेहलता निकाळजे, प्रिया जिचकार, हेमलता रावेकर आदींनी सहकार्य केले.
देवळी तालुका
नाचणगाव : येथील यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष सतीश राऊत, प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती भगवान भरणे, पं.स. सदस्य वर्षा घोडेस्वार, किशोर मडावी, सरपंच सुनिता जुनघरे, हरिभाऊ चांदोरे, नरेश हणमंते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी पर्यावरणपुरक प्रतिकृती सादर केल्या. यासह अक्षय उर्जा, प्रदुषण याबाबत प्रतिकृती मांडण्यात आल्या. प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक इंडीयन मिलीटरी स्कूल, पुलगाव येथील शंतनू आसोले याने मिळविला. तर द्वितीय स्थानमॅडमवार विद्यालय, टाकळी येथील प्रणय पवार, तृतीय आर. के. हायस्कूल पुलगाव येथील आचल पागोटे, यांना देण्यात आले. माध्यमिक गटात प्रथम क्रमांक लेबर कॅम्प पुलगाव येथील अश्वजित पाटिल, द्वितीय जनता विद्यालय, देवळी येथील गीत राऊत, तृतीय स्थानावर सम्यक विद्यालय, शिरपूर येथील संकेत भेले याने मिळविला. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विजय जाधव, प्रा. वीणा काळे यांनी केले तर आभार विज्ञान शिक्षक संगिता धाबे यांनी केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Eco-friendly replicas produced by the child scientists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.