शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

नाफेडच्या चणा खरेदीला अस्पष्ट सूचनांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 10:28 IST

तूर खरेदीनंतर नाफेडच्यावतीने आता चण्याची खरेदी सुरू होत आहे. या खरेदीतही प्रारंभी नेहमीप्रमाणे अडचणीच येत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देआदेश धडकले यंत्रणा पडली बुचकाळ्यात

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तूर खरेदीनंतर नाफेडच्यावतीने आता चण्याची खरेदी सुरू होत आहे. या खरेदीतही प्रारंभी नेहमीप्रमाणे अडचणीच येत असल्याचे दिसत आहे. एका शेतकऱ्यांकडून एकराच्या हिशेबाने किती खरेदी करावी याचा उल्लेख आदेशात नाही. परिणामी, खरेदी प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी असलेली यंत्रणा बुचकळ्यात पडली आहे. यामुळे खरेदीचा मुहूर्त केव्हा आणि कसा साधावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.ज्या केंद्रांवरून तूर खरेदी सुरू आहे, त्याच केंद्रांवरून चण्याची खरेदी होणार आहे. या केंद्रांवर तूर आणणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी आहे. तूर उत्पादकांच्या गर्दीत पुन्हा चण्याची खरेदी कशी करावी, असा प्रश्न केंद ्रचालकांसमोर आहे. अशा परिस्थितीत खरेदी करताना या यंत्रणेचा चांगलाच कस लागणार असल्याचे दिसते. केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची कमतरता आणि साहित्याचा अभाव यामुळे तूर खरेदीला गती नाही. यात आता चण्याची खरेदी सुरू करावी लागत असल्याने काम कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांच्या शेतातील चणा निघणे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येताच दर पडणे सुरू आहे. व्यापाऱ्यांकडून चण्याला सध्या ३२०० ते ३५०० रुपयांच्या आसपास दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना किमान हमीभावाचे ४४०० रुपये मिळावे, अशी अपेक्षा आहे. या अपेक्षेमुळे शेतकऱ्यांची नाफेडच्या केंद्रावर गर्दी होणे स्वाभाविक आहे; पण मर्यादेची समस्या निर्माण झाल्याने अडचणी आहेत. यावर शासनाने त्वरित मार्ग काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आहे.

चण्याच्या खरेदीतही रंगाची अटतूर खरेदीत पोतं शिवण्याकरिता काही ठराविक रंगाच्या सूतांचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या रंगानुसार चण्याचीही खरेदी व्हावी, अशा सूचना आहे. मात्र आदेशित केलेल्या रंगाचे सूत मिळत नसल्याने जमेल त्या रंगाच्या सूताने पोते शिवण्याचे काम सुरू असल्याचे चित्र राज्यात आहे.

तुरीच्या नियमानुसार होणार खरेदीयंदाच्या हंगामात शासनाने सोयाबीन, तूर आॅनलाईन नोंदी करून खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसारच चण्याचीही खरेदी होणार आहे. यामुळे शेतकºयांना पहिले चण्याकरिता आॅनलाईन नोंदी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. चणा विक्रीकरिता आॅनलाईन पद्धत अंमलात येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना नसल्याने त्यांची तारांबळ उडत आहे.वर्धा जिल्ह्यात तूर खरेदी होत असलेल्या सात केंद्रांवरून चण्याची खरेदी करण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र मर्यादेच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना सध्या थांबा असे सांगण्यात येत आहे.

चणा खरेदी करण्यासंदर्भात सूचना आल्या आहेत. या सूचना करताना एकरी मर्यादा सांगण्यात आल्या नाही. या संदर्भात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही हात वर केले आहे. यामुळे खरेदीचा मुहूर्त कसा साधाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.- व्ही.पी. आपदेव, जिल्हा मार्केटींग अधिकारी, वर्धा.

टॅग्स :agricultureशेती