शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मसालेदार पदार्थ खाताय अन् बैठकीची कामे; मूळव्याधीचा धोका, घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 18:02 IST

विविध कारणांमुळे समस्या वाढतीवर : तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा त्वरित आहारात बदल

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गुदद्वारातील आजारांबाबत अलीकडे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढलेल्या आहेत. अधिक वेळ बैठे काम करणे, फायबरची कमतरता, पाणी कमी पिणे यासह विविध कारणांमुळे मूळव्याधीची समस्या वाढत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेणे आवश्यक आहे, अन्यथा हा आजार वाढत जातो. त्यानंतर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय राहत नाही.

गुदद्वाराच्या अंतिम भागात सुजलेल्या शिरा, मलविसर्जन करताना रक्तस्राव, वेदना जाणवणे ही मूळव्याधीची पहिली लक्षणे आहेत. यापैकी कोणतीही लक्षणे पाहिल्यास ताबडतोब डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे, मूळव्याध धोकादायक किंवा जीवघेणा नसतो. दीर्घ कालावधीसाठी स्थितीकडे दुर्लक्ष केल्यास, गंभीर गुंतागुंत होऊ शकते. 

मूळव्याध अन् फिशरची लक्षणे सारखीच आहे काय?मूळव्याधीमध्ये रक्तस्राव होताना रुग्णाला वेदना होत नाही, तर फिशरमध्ये रक्तस्त्रावासोबतच वेदना पण होतात. मूळव्याध, भगंदर, फिशर या गुदद्वारासंबंधीच्या समस्यांपैकी सर्वात सामान्य समस्या आहेत. हे तिन्ही रोग प्रोक्टोलॉजीओ- तर्गत येतात आणि काही सामान्य लक्षणे असतात. तथापि, यापैकी प्रत्येक विकार भिन्न आहेत आणि उपचारांची भिन्न पद्धत आहे. मूळव्याध, भगंदर, फिशर यात फरक आहे.

मूळव्याधीची लक्षणे कोणती?गुदद्वाराजवळ वेदना किवा जळजळ होणे, मलविसर्जनाच्या वेळी रक्त येणे, गाठीसारखे फुगलेले भाग जाणवणे, खाज येणे किंवा अस्वस्थता वाटणे आदी. लक्षणे मूळव्याधीची आहेत.

मूळव्याध कसा टाळता येतो? भरपूर फायबर असलेले पदार्थ आहारात वापरावे. फळे, भाज्या, आणि पूर्ण धान्यांचा समावेश करावा. दिवसाला कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. नियमित व्यायाम करावा. दीर्घकाळ बसण्याचे टाळावे. मलविसर्जनाची वेळ नियमित ठेवावी. जास्त दाब येईल, अशा जड वस्तू उचलू नयेत.

भगंदर, फिशर एकच आहे काय? भगंदर म्हणजे, गुदद्वाराच्या ग्रंथींना संसर्ग होतो आणि पू वाहणे सुरू होते. फिशर म्हणजे, गुदद्वा- राभोवती फाटणे किंवा कट होणे, हे खूप वेदना- दायक आहे. मलविसर्जन करताना तुटलेल्या काचेतून आपण जात आहोत, असे जाणवते. 

मूळव्याध होण्याची कारणेपोटात गाठी होणे, पोटात पाणी भरणे, यकृताचा आजार, गर्भधारणा, अतिजड वजन उचलणे, दीर्घकाळ बसणे, गुदद्वारासंबंधीचा संभोग, कमी फायबरयुक्त आहार घेणे, सततचा खोकला आदी कारणे मूळव्याधीची आहेत. दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठता, मलत्याग करताना जास्त कुंथन करणे, अधिक दिवसांपासूनचा अतिसार, आनुवंशिकता हीसुद्धा कारणे मूळव्याधीची आहेत.

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सwardha-acवर्धा