शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वादातून तिघांकडून दोघांवर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:33 PM

क्षुल्लक कारणावरून तिन युवकांनी दोन युवकांवर चाकू हल्ला करून त्यांना जखमी केले. जखमींमध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून ही घटना स्थानिक सानेवाडी भागातील रेल्वे वसाहत परिसरात रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. सदर प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंविच्या ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून तिनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देसानेवाडीतील घटना : तिनही आरोपी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : क्षुल्लक कारणावरून तिन युवकांनी दोन युवकांवर चाकू हल्ला करून त्यांना जखमी केले. जखमींमध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून ही घटना स्थानिक सानेवाडी भागातील रेल्वे वसाहत परिसरात रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. सदर प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंविच्या ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून तिनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.पोलीस सुत्रानुसार, रोहित चौधरी, कुणाल कांबळे व रोहन पाटील हे तरुण सानेवाडी भागातील रेल्वे वसाहत परिसरात उभे असता अचानक काही तरुण आपल्या ताब्यातील दुचाकी धुमस्टाईल चालवित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दुचाकी चालकाला त्याबाबत हटकले असता दुचाकीवरील तिनही तरुणांनी परतून येत रोहित चौधरी, कुणाल कांबळे व रोहन पाटील यांच्याशी वाद करून चक्क चाकूने मारहाण केली. यात रोहित चौधरी हा गंभीर जखमी झाला. तर कुणाल कांबळे याच्या हाताला गंभीर स्वरूपाची इजा झाल्याने तो जखमी झाला.या प्रकरणी तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात हिंदनगर येथील यश श्रीवास्तव, गुड्डू लोखंडे व पुलफैल येथील शुभम धोंगडे विरुद्ध भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.