शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

ग्राहक हक्क जागृतीत निधीचा खोडा

By admin | Updated: March 15, 2015 01:56 IST

‘जागो ग्राहक जागो’ ‘जागरूक ग्राहक देशाचा जबाबदार नागरिक’ अशा स्लोगन दरदिवशी कानावर पडतात.

श्रेया केने वर्धा‘जागो ग्राहक जागो’ ‘जागरूक ग्राहक देशाचा जबाबदार नागरिक’ अशा स्लोगन दरदिवशी कानावर पडतात. सार्वजनिक स्थळांवर पोस्टरमधून तर सोशल मिडियावर ही ग्राहक जागृतीचा उदोउदो होतो; मात्र प्रत्यक्षात ग्राहक त्यांच्या हक्काबाबत कितपत जागरूक आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. ग्राहकांना हक्काबाबत जागृत करण्यासाठी केवळ केंद्रस्तरावर यंत्रणा कार्यरत असून जिल्हास्तरावरील यंत्रणेकरिता निधी उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने अडचण येते. वर्षभरात दोन दिवसांचा अपवाद वगळता उर्वरित दिवसात ग्राहक हक्क जागृतीचे कार्य थंडबस्त्यात असते. जागतिक ग्राहक दिन व राष्ट्रीय ग्राहक दिनाकरिताजिल्हा यंत्रणेला निधी मिळतो. शासकीय स्तरावर कार्यक्रम घेवून औपचारिकता पार पाडली जाते. एनजीओच्या माध्यमातून जागृतीचे कार्य होत असले तरी निधीअभावी जागृती कार्यावर त्याचा परिणाम होतो. जिल्हास्तरावर जनजागृतीकरिता असलेली समिती ठरते कुचकामीग्राहकांमध्ये त्यांच्या हक्काविषयी जागृती करण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अंतर्गत समिती गठीत केली जाते. या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. शिवाय सामाजिक क्षेत्रात कार्यरत, संबंधित विभागाचे अधिकारी विधीज्ञ अशा व्यक्तींचा यात समावेश असतो. या माध्यमातून ग्राहकांच्या संबंधित तक्रारींचा आढावा घेऊन त्यावर चर्चा केली जाते. तसेच तक्रारकर्त्याला न्याय मिळवून देण्याकरिता सदर प्रकरण ग्राहक तक्रार निवारण मंचकडे हस्तांतरीत केले जाते. ग्राहक तक्रार निवारण मंचच्या माध्यमातून अर्जदाराला वकीलाशिवाय आपली बाजू मांडता येते. याकरिता मंचाचे सदस्य व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळते. या प्रकरणात ९० दिवसांत निकाल देणे बंधनकारक आहे.शासनाकडून निधीची कमतरता अशासकीय संघटना म्हणजेच समाजसेवा करणाऱ्या एनजीओंच्या माध्यमातून ग्राहक हक्क जागृती मोहीम राबविली जाते. या क्षेत्रात कार्यरत संस्थांना शासनाकडून प्रस्ताव मागवूनही निधीच मिळत नाही. जिल्हास्तरावर अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्यावतीने चार वर्षे सतत कार्य करूनही निधीच आला नाही. अखेर हे कार्य स्थगित करावे लागल्याचे संस्था सदस्यांनी सांगितले.