पोलिसांच्या सतर्कतेने टळली मालमत्तेच्या वादातून होणारी झडप

By Admin | Updated: June 10, 2016 02:18 IST2016-06-10T02:18:26+5:302016-06-10T02:18:26+5:30

तालुक्यातील शिरपूर (बोके) येथे शेतीच्या कारणावरून सुरू असलेला वाद मोठ्या भांडणाचे स्वरूप घेणार होता.

Due to the vigilance of police | पोलिसांच्या सतर्कतेने टळली मालमत्तेच्या वादातून होणारी झडप

पोलिसांच्या सतर्कतेने टळली मालमत्तेच्या वादातून होणारी झडप

१३ जणांना अटक : शिरपूर (बोके) येथील घटना
आर्वी : तालुक्यातील शिरपूर (बोके) येथे शेतीच्या कारणावरून सुरू असलेला वाद मोठ्या भांडणाचे स्वरूप घेणार होता. तत्पूर्वीच, पोलिसांनी मध्यस्थी करून तो वाद सोडविला. ही घटना बुधवारी घडली. या प्रकरणी ेपोलिसांनी १३ जणांना अटक केली.
अयुब शहा (४५), शहजाद शहा अमिन शहा (२०) रा. अमरावती, फैजल शहा (१८), नईम शहा (२३), जाकीर शहा (२४), सय्यद जमीर (३०), रियाद शहा (२६) रा. रिद्धपूर, साबीर शहा (३८), सलाम शहा (३०), शारीग शहा (२८), शब्बीर शहा (६३), मतीन अहेमद (३८), अदिम शहा (२९) अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत.
शिरपूर बोके येथील हसन शहा यांच्या वडिलोपार्जीत मालमत्तेतील २४ एकर शेती शिरपूर येथे आहे. त्यांना दोन मुली असून एकीचे नाव महरूबी रा. यवतमाळ तर दुसरी जयरूबी रा. नागपूर असे आहे. अयुब शहा हा त्यांचा मुलगा आहे. सद्यस्थितीत अयुब शहा आणि हसन शहा हे दोघेही जिवंत नाहीत; पण त्यांच्या मालकीची असलेल्या २४ एकर शेतीचा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे.
दरम्यान, हसन शहा यांच्या दोन्ही मुली महरूबी व जयरूबी यांनी आपली २४ एकर शेती येथील एका शेतकऱ्याला भाड्याने दिली. अयुब शहाची पत्नी रेहान बी हिने त्यांचा विरोध केला. या दोघी बहिणींचा वाद पाहून सदर शेतकऱ्याने प्रथम तुमचा वाद निकाली काढा आणि नंतरच मी तुमचे शेत करतो, असे सांगितले.
हा वाद सुरू असतानाच दोन्ही गटातील सदस्य शेतात एकत्र जमले. त्यांनी शस्त्रासह वाद सुरू करण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. वादाचे गांभीर्य ओळखून आर्वीचे ठाणेदार शैलेंद्र साळवी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहून अमरावती आणि रिद्धपूर येथील नागरिक दुचाकीने पसार होण्याच्या प्रयत्ना होते. ही बाब लक्षात येताच त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात त्यांच्यावर भादंविच्या कलम १४३, १४४, ४७, ४८, ३४९, ४/२५ आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील १३ आरोपींना गुरूवारी न्यायालयात हजर केले.
प्रकरणाचा तपास ठाणेदार शैलेंद्र साळवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बुध करीत आहे. ग्रामस्थांनी वेळीच माहिती दिली नसती व पोलिसांनी सतर्कता दाखविली नसती शिरपूर येथे मोठी घटना घडली असती.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Due to the vigilance of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.