शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये वाढली उदासीनता; कापसामागची साडेसाती संपेना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 18:22 IST

शेतकऱ्यांचा सवाल : शेतीवरील वाढत्या खर्चाने कंबरडे मोडले

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात कपाशीचे मुख्य पीक घेतले जाते; मात्र दरवर्षी लागवड खर्चात मोठी वाढ होऊन कपाशीच्या दरामागची साडेसाती काही संपली नाही. त्यामुळे साहेब जगायचे कसे, असा प्रश्न शेतकरी विचारू लागला आहे. 

सध्या कापसाचे बाजारभाव हे उलट्या दिशेने सुरू असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मागील वर्षी कापसाला चांगला दर मिळाल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा कापसाची लागवड केली. पावसाचा फटका बसून उर्वरित कापूस शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्चुन वेचून घेतला. कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकरी होते; परंतु कापसाचे भाव कोसळत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले. मागच्या वर्षीचा विचार केला तर कापसाला कधी नव्हे एवढा उच्चांकी दर मिळाला होता. यावर्षी देखील तीच अपेक्षा शेतकरी बंधूंना आहे. मागील वर्षी जो कपाशीला चांगला भाव मिळाला होता, परंतु यंदा ही अपेक्षा फोल ठरताना दिसून येत आहे. 

कोणी वाली उरला नाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कोणी वाली उरला आहे की नाही, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडू लागलाय. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेला कापूस आता घरात ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली. व्यापारी आणि शासन यांच्या कैचीत शेतकरी मात्र अडकून पडलाय.

बोंडअळी टपलेली, औषधी महाग जनुकिय बदल करून कपाशीचे बियाने बाजारात आले. किडरोग येणार नाही असे सांगितले जात होते; मात्र गेल्या चार-पाच वर्षात बोंडअळी मोठे नुकसान केले. शिवाय कीटकनाशकांचा खर्च वाढला.

उसनवारी नील अन् शेतात कापूसही नील! जिल्ह्यातील बरेच शेतकरी शेतीच्या हंगामात उसनवारीने पैसे काढतात. काही शेतकरी बँकांकडून कर्ज घेण्यासाठी उंबरठे झिजवितात. मात्र, काही उपयोग होत नाही. त्यामुळे उसनवारी व शेतातील कापूसही नील, असे चित्र आहे.

किलोला १० रुपये देऊनही मजूर मिळेना कापूस वेचणीसाठी किलोला १० रुपये मोबदला देऊनही मजूर मिळत नाही. मजुरांअभावी कापूस शेतातच पडून राहतो. काढणी करून विकण्यास विलंब झाल्यास व्यापारी अल्प दर देऊन बोळवण करतात.

कापसाचा भाव अजून वाढणार का? लागवड खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या हातात काहीही शिल्लक राहत नाही. पुढील हंगामाची व्यवस्था कशी करायची व कुटुंबाचे काय, या दुहेरी प्रश्नात शेतकरी अडकला आहे.

पाच वर्षांत एकदाच १० हजारांपुढे वर्ष                       भाव २०१९                    ५२०० २०२०                    ५८२५ २०२१                   १०,००० २०२२                    ७५००२०२३                    ७०५० २०२४                    ७१००

व्यापारी/उत्पादक म्हणतात..... आमचा नाईलाज कापूस दराचे सरकारी धोरण उत्पादक व व्यापारी यांच्यासाठी उपयुक्त असायला हवे. मात्र, सध्या उलट चालले आहे. त्यामुळे आमचाही नाईलाज आहे. असे व्यापाऱ्यांने सांगितले.

"शासनाने हमीभाव जाहीर केले. मात्र कापसाचे हमीभाव दरवर्षी कागदावरच राहते. अन्य वस्तूंचे दर वाढत असताना शेतमालाचे दर पाडले जात आहेत हा प्रकार नेहमीच शेतकऱ्यांसोबत घडतो." - प्रवीण वंजारी, उत्पादक

टॅग्स :cottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती