मघा गरजले अन् पूर्वा ते चित्रा नक्षत्रात पाऊस

By Admin | Updated: October 21, 2014 22:56 IST2014-10-21T22:56:14+5:302014-10-21T22:56:14+5:30

मघा नक्षत्र गरजले की पुढील नक्षत्रामध्येही पाऊस येतोच असा अंदाज आणि पुर्वानुभव ज्येष्ठ शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यांचा हा अंदाज खरा ठरत असल्याचे यंदाच्या हंगामात दिसले. याबाबतचे वृत्त

Due to the thunderstorm and rain from the east to Chitra Nakshatra | मघा गरजले अन् पूर्वा ते चित्रा नक्षत्रात पाऊस

मघा गरजले अन् पूर्वा ते चित्रा नक्षत्रात पाऊस

विजय माहुरे - घोराड
मघा नक्षत्र गरजले की पुढील नक्षत्रामध्येही पाऊस येतोच असा अंदाज आणि पुर्वानुभव ज्येष्ठ शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यांचा हा अंदाज खरा ठरत असल्याचे यंदाच्या हंगामात दिसले. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते.
मघा संपताच पुर्वा नक्षत्र ३० आॅगस्टला सुरू झाले आणि ४, ५, ६ ,७ सप्टेंबर असा चार दिवस पाऊस आला. १३ सप्टेंबरला उत्तरा नक्षत्राला सुरुवात झाली आणि आणि १४ सप्टेंबरला पावसाची रिमझीम सुरू होती. दि. २७ ला हस्त नक्षत्र सुरू झाले आणि ८ व ९ आॅक्टोबरला पावसाने हजेरी लावली. १० आॅक्टोबरला चित्रा नक्षत्र सुरू झाले आणि ढगाळ वातावरणाची निर्मिती होत १५ ला एक तास मुसळधार पाऊस आला.
मघा ते चित्रा नक्षत्रा दरम्यान सतत कमी जास्त पाऊस आल्यास कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला; पण चित्रा नक्षत्र हे सोयाबीन पिकाची संवगणी आणि मळणी करण्यासह शितदहीचा कापूस वेचणीचा काळ आहे. यावेळस पाऊस आल्यास नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यला वर्तविली होती. तो वर्तविलेला अंदाजही खरा ठरला. १५ आॅक्टोबरला आलेल्या मुसळधार पावसामुळेही अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
३० आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता झालेली मेघगर्जना व विजेचा कडकडाट हा मघा नक्षत्रात झाल्याने पुर्वानुभव व्यक्त केला जात होता. आता स्वाती नक्षत्र सुरू होण्यास काही दिवस असले तरी ते दिवाळीत येत आहे. या नक्षत्रात काही ना काही पाऊस यावा म्हणजे सव्वा पटीने उत्पन्नात वाढ होते, असा पुर्वानुभव आहे.
चारही नक्षत्रात आलेला पाऊस याला दुजोरा देणारा आहे. शेतकरी हा निसर्गावर अंवलबून असतो. जुन्या अनुभवावर शेती केली जाते. शेतकरी परिवारात आजोबा नातवंडाला याची माहिती देतात, सध्या मात्र परिस्थिती बदलली आहे.

Web Title: Due to the thunderstorm and rain from the east to Chitra Nakshatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.