सातवा वेतन आयोग व भाजपा सरकारविरोधात धरणे
By Admin | Updated: July 13, 2016 02:46 IST2016-07-13T02:46:57+5:302016-07-13T02:46:57+5:30
जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातवा वेतन आयोग व भाजप सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

सातवा वेतन आयोग व भाजपा सरकारविरोधात धरणे
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला काँग्रेसतर्फे घोषणा
वर्धा : जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातवा वेतन आयोग व भाजप सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच शासनाविरोधात घोषणाही देण्यात आल्या.
केंद्र शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे. पण याचा त्याचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना काहीही उपयोग झालेला नाही असे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. काँगे्रस सरकारने सातव्या वेतन आयोगामध्ये ४० टक्के वाढ सुचविली होती. पण भाजपा सरकारने ती केवळ २३ टक्के केलेली आहे.
त्यातही कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या महागाई भत्त्यात मोठी कपात केलेली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. म्हणूनच जनमानसाचा आधार असलेल्या काँग्रेसने या सातव्या वेतन आयोग विरोधात पाऊले उचलली आहे. त्या करिताच सदर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र शासनाविरोधात घोषणाही करण्यात आल्या.
आंदोलनामध्ये जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष हेमलता मेघे, कुंदा भोयर, संध्या राऊत, सुरेखा चिटे, शालु इवनाथे, आशा भुजाडे, राजश्री देशमुख, मुक्ता, चांभारे, रेखा सोनवने, भारती खोड, सुप्रिया शिंदे, तबस्सुम आझमी, लुबींनी फुलमाळी, विमल कांबळे, वहिदा शेख, मंगला इंगळे, पुष्पा लाबंट, सुरेखा सुपारे, वर्षा पाटोळे, आरती भोयर आदींसह इतरही काँग्रेस महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.