उघड्या नालीमुळे अपघाताचा धोका

By Admin | Updated: August 27, 2014 23:47 IST2014-08-27T23:47:07+5:302014-08-27T23:47:07+5:30

नजीकच्या पवनार येथील ंंआश्रम परिसराकडे जाणाऱ्या लहान पुलावरील मार्गावर रस्त्याच्या कडेला गत काही महिन्यांपूर्वी केबल टाकण्यासाठी नाली खोदण्यात आली. परंतु अद्यापही ती बुजविण्यात

Due to the open drain, the risk of accidents is due to the accident | उघड्या नालीमुळे अपघाताचा धोका

उघड्या नालीमुळे अपघाताचा धोका

वर्धा : नजीकच्या पवनार येथील ंंआश्रम परिसराकडे जाणाऱ्या लहान पुलावरील मार्गावर रस्त्याच्या कडेला गत काही महिन्यांपूर्वी केबल टाकण्यासाठी नाली खोदण्यात आली. परंतु अद्यापही ती बुजविण्यात न आल्याने अपघाताचा धोका संभवित आहे.
पवनार येथील विनोबा आश्रम आणि नंदीखेडा परिसरात दररोज शेकडो नागरिक येत असतात. श्रावण महिना असल्याने सध्या या मार्गावर गर्दी पाहावयास मिळते. या मार्गावर रस्त्याच्या कडेला दीड ते दोन महिन्यापासून केबल टाकण्यासाठी नाली खोदण्यात आली. केबल टाकल्यावर सदर नाली बुजविल्या जाणे गरजेचे होते. पण अद्यापही ती बुजविलेली नाली. खोदताना काढलेली माती तशीच पडून आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली असून वाहनचालकांना ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. त्याचप्रकारे जवळच केबलसाठी केलेला खड्डाही तसाच असल्याने त्यात पाणी साचली आहे. त्यातही रात्रीच्या वेळी खड्ड्यात पडून अपघात होण्याचा धोका आहे.
पावसामुळे ही माती वाहून रस्त्यावर येत असून तेथेही चिखल तयार होत आहे. ग्राम पंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Due to the open drain, the risk of accidents is due to the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.