शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

लिलाव न झाल्याने दुप्पट दराने होतेय वाळूची सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील आठही तालुक्यातील समितीने घाटांची तपासणी करुन ३७ घाट लिलावास योग्य ठरवून तसा प्रस्ताव पर्यावरण अनुमतीस पाठविला. अद्यापही अनुमतीच मिळाली नसल्याने लिलावातून मिळणारा आठ ते दहा कोटींचा महसूल बुडाला आहे.  सध्या वाळू  चोरीला चांगलेच उधाण आले असून ३९०० रुपये ब्रासची वाळू आता आठ ते दहा हजार रुपयात घ्यावी लागत आहे.

ठळक मुद्देशासनाचा बुडतोय महसूल, आठ ते दहा हजार प्रतिब्रास विकतात वाळू

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने नवीन वाळू निर्गती धोरणानुसार वाळू घाटांचे लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा खनिकर्म विभागाकडून पर्यावरण अनुमतीकरिता जनसुनावणी घेऊन प्रस्ताव सादर केले. पण, यावर्षीची मान्सून सायकल संपली तरीही घाटांचे लिलाव झाले नाही. परिणामी चोरीला उधान आले असून दुप्पट दरात वाळूची विक्री होत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील समितीने घाटांची तपासणी करुन ३७ घाट लिलावास योग्य ठरवून तसा प्रस्ताव पर्यावरण अनुमतीस पाठविला. अद्यापही अनुमतीच मिळाली नसल्याने लिलावातून मिळणारा आठ ते दहा कोटींचा महसूल बुडाला आहे.  सध्या वाळू  चोरीला चांगलेच उधाण आले असून ३९०० रुपये ब्रासची वाळू आता आठ ते दहा हजार रुपयात घ्यावी लागत आहे.

कुठून येते वाळूजिल्ह्यात वर्धा नदी, वणा नदी, यशोदा नदी आदी ठिकाणच्या वाळू घाटातून वारेमाप उपसा सुरु असल्याने या हिंगणघाट, देवळी, समुद्रपूर, आर्वी व सेलू या तालुक्यातून वाळू चाेरी सुरु आहेत. याच ठिकाणावरुन लगतच्या शहरातही वाळू पुरवठा केल्या जातो.

हरित लवादाची बैठकहरित लवादाकडून जबाबदारी महाराष्ट्र प्रदुषण नियमक मंडळाला दिली आहे. आता या मंडळाकडूनच पर्यावरण अनुमती संदर्भात निर्णय घेऊन घाट लिलावास परवानगी दिली जाते. पण, या मंडळाला राज्यस्तरीय बैठक घेण्याचा मुहूर्तच सापडलेला नाहीत.

वाळूघाट लिलावाचा प्रश्न हा एकट्या जिल्ह्याचा नसून राज्याचा आहे. शासन स्तरावरुनच ही प्रक्रिया रखडली आहे. जिल्ह्यातील वाळू घाटासंदरर्भातील अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व यंत्रणाही कार्यरत आहे.- विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी

टॅग्स :sandवाळू