स्वच्छतेमुळे आजार टाळता येतात
By Admin | Updated: September 9, 2014 00:35 IST2014-09-09T00:35:20+5:302014-09-09T00:35:20+5:30
नवनवीन आजारांची लागण होत असल्याचे निदाण करणे डॉक्टरांना अवघड झाले आहे. यामुळे ग्रामीण भागाची आर्थिक घडी विस्कळीत होऊन जनतेला जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागते.

स्वच्छतेमुळे आजार टाळता येतात
वर्धा : नवनवीन आजारांची लागण होत असल्याचे निदाण करणे डॉक्टरांना अवघड झाले आहे. यामुळे ग्रामीण भागाची आर्थिक घडी विस्कळीत होऊन जनतेला जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागते. हे प्रकार टाळण्यासाठी सर्वांना परिसर व वैयक्तीक स्वच्छता करून किटकजन्य आजार टाळता येतात, असे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सुनतकरी यांनी व्यक्त केले.
नेत्रदान पंधरवडा २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर व कुष्ठरोग जनजागृती मोहीम यानिमित्त संत केजाजी महाराज विद्यालय तरोडा येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तरोडत्त येथील संत केजाजी महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक गोळे तर अतिथी म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना सुनतकरी वर्धा, खरांगणा (गोडे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनल चामटकर, डॉ. पुष्पा सिंग, डॉ. खोब्रागडे आदी उपस्थित होते. अंधत्व निवारण कार्यक्रमाबाबत काकडे यांनी माहिती दिली. कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रमांतर्गत मुरमे यांनी तर किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पिसे यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांना वैयक्तीक स्वच्छतेबाबत माहिती देऊन हात धुण्याचे प्रात्यक्षिक डॉ. चामटकर यांनी विद्यार्थ्यांना करून दिले. यावेळी जनजागृती कार्यक्रमांतर्गत तरोडा येथे प्रात्याक्षित करण्यात आले. यावेळी प्रदर्शन लावण्यात आले. संचालन बाहे यांनी केले तर आभार एकनाथ देवढे यांनी मानले. कार्यक्रमाला अमीत कोपुलवार, झाडे, दीपा कांबळे, जाधव, आम्रपाली पाटील आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)