महिला बचत गटांमुळे अवैध सावकारीला चाप

By Admin | Updated: August 29, 2014 00:01 IST2014-08-29T00:01:04+5:302014-08-29T00:01:04+5:30

ग्रामीण भागात महिलांचे बचत गट हे लाभदायी ठरत आहे. या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाणीचा व्याप वाढला आहे़ कुटुंबातील आर्थिक कामे सहज होत आहेत़ शिवाय बचत गटांचा सर्वाधिक लाभ

Due to female saving groups invalid banker's arc | महिला बचत गटांमुळे अवैध सावकारीला चाप

महिला बचत गटांमुळे अवैध सावकारीला चाप

वायगाव (नि.) : ग्रामीण भागात महिलांचे बचत गट हे लाभदायी ठरत आहे. या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाणीचा व्याप वाढला आहे़ कुटुंबातील आर्थिक कामे सहज होत आहेत़ शिवाय बचत गटांचा सर्वाधिक लाभ सध्या शेतकऱ्यांना होताना दिसतोय़ बँकेचे कर्ज न मिळाल्यास शेतकऱ्यांना सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत होते़ आता बचत गटांद्वारे शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा होऊ लागला आहे़ यामुळे अवैध सावकारीला चाप बसला आहे़
महिला बचत गटाची आर्थिक उलाढाल ग्रामीण भागात वाढीस लागली आहे़ यामुळे सावकाराकडून पैसे घेणाऱ्यांची संख्याही कमी व्याजदाराने वापरता येत आहे. यामुळे एकप्रकारे महिला बचत गटामुळे पुरुषाच्या सावकारीला आळाच बसल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही आर्थिक व्यवहाराचे चित्र बदलत चालले आहे. पुरुषाच्या बचत गटाबरोबरच महिलांनीही बचत गटाची स्थापना केली़ या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला हातभार लागत असल्याचे दिसते़ जिल्हाभरात अनेक ठिकाणी महिला बचत गटाच्या महिलांनी लहान-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत़ सध्या ते चांगल्या प्रकारे सुरू आहेत. ग्रामीण भागात महिलांच्या बचत गटाचा शेतकऱ्यांनाही चांगलाच फायदा होत आहे.
बी-बियाणे, खते, औषधी, खरेदीसाठी अनेक शेतकरी महिलांच्या बचतगटातील पैसे वापरले जात असल्याचे दिसते़ शिवाय बचत गटातील रकमेचे व्याज दरही कमी असतात. यामुळे पूर्वीप्रमाणे खासगी सावकाराकडून व्याजाचे पैसेही घेण्याची गरज नाही. ग्रामीण भागात अनेकदा खासगी सावकारांनी शेतकऱ्यांना पैसे देऊन त्यांच्या जमिनी बळकावल्या़ अनेकांनी सावकाराचे पैसे देणे होत नसल्याने आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्या आहेत. यावर्षी पावसाने दडी मारल्याने दुबार तर तिबार पेरणी करावी लागली़ यात बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी मोठा खर्च आला़ ही आर्थिक कामे शेतकरी महिला बचत गटातून शेतकऱ्यांना करता आलीत़ महिला बचत गटांची शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईला सामोरे जाण्यास मदतच झाल्याचे दिसते़(वार्ताहर)

Web Title: Due to female saving groups invalid banker's arc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.