कपाशीवर ‘मर’ रोगाचा प्रार्दुभाव
By Admin | Updated: July 18, 2014 00:16 IST2014-07-18T00:16:50+5:302014-07-18T00:16:50+5:30
एक महिन्याच्या प्रदीर्घ कालखंडानुसार पावसाने हजेरी लावली; पण या पावसामुळेही स्प्रिंकलरने ओलित केलेल्या कपाशीवर ‘मर’ रोगाचा प्रार्दुभाव झाला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले असून

कपाशीवर ‘मर’ रोगाचा प्रार्दुभाव
घोराड : एक महिन्याच्या प्रदीर्घ कालखंडानुसार पावसाने हजेरी लावली; पण या पावसामुळेही स्प्रिंकलरने ओलित केलेल्या कपाशीवर ‘मर’ रोगाचा प्रार्दुभाव झाला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले असून उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे़
जून महिन्याच्या मृग नक्षत्रात ओलिताच्या साधनांचा वापर करीत शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरच्या साह्याने कपाशीची पेरणी केली होती. त्याची वाढही झाली; पण मंगळवारी आलेल्या पावसामुळे कपाशीच्या शेतातील काही झाडे वाळू लागलीत़ पाने कोमेजली असून अंकूरलेले रोपटे मरणासन्न अवस्थेत सिून येत आहे़ या रोगाला ‘मर’ रोग म्हणून संबोधले जाते. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतातूर दिसून येत आहेत़ कपाशीचे रोपटे पात्या, फुलावर असताना ही स्थिती गतवर्षी पावसाळ्यात आली होती. आधीच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पावसाच्या दडीमुळे बिकट झाली आहे़ आता नव्याने आलेले हे संकट अहोरात्र मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे़
पावसामुळे आनंदात असलेल्या शेतकऱ्यांनी दुबार पेरणीला सुरुवात केली आहे. महागड्या बियाण्यांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रात दोन दिवसांत शेतकऱ्यांनी गर्दी केली; पण उन्हाच्या तडाक्यात कपाशीचे पीक वाचविण्याचा आटापिटा करणाऱ्या शेतकऱ्यापुढे ‘मर’ रोगामुळे हतबल होण्याची वेळ आली आहे.(वार्ताहर)