आंदोलनामुळे वनपरिक्षेत्रात चराईला उधाण

By Admin | Updated: September 1, 2014 23:48 IST2014-09-01T23:48:28+5:302014-09-01T23:48:28+5:30

वन कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे तळेगाव, आष्टी वनपरिक्षेत्रात चराईचे प्रमाण वाढले़ सोबतच वन्यप्राण्याच्या शिकारीवर अंकुश बसविण्यात मनुष्यबळाचा अभाव अडसर ठरत आहे़

Due to agitation, grazing flood in forest areas | आंदोलनामुळे वनपरिक्षेत्रात चराईला उधाण

आंदोलनामुळे वनपरिक्षेत्रात चराईला उधाण

तळेगाव (श्यामजीपंत) : वन कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे तळेगाव, आष्टी वनपरिक्षेत्रात चराईचे प्रमाण वाढले़ सोबतच वन्यप्राण्याच्या शिकारीवर अंकुश बसविण्यात मनुष्यबळाचा अभाव अडसर ठरत आहे़ कामबंद आंदोलनाला सात दिवस लोटले तरीही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर शासनाकडून कोणताही तोडगा अद्यापर्यंत निघालेला नाही़ वन रक्षणकर्त्यांनीच कामबंद आंदोलन सुरू केल्याने वनांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे़
गावपातळीवरील ग्राम समितीची मदत घेतली जात आहे़ ग्राम, समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना जंगल रक्षणाबद्दल सांगण्यात येते़ तळेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही़व्ही़ तळणीकर यांनी चराई करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा चालविला होता़ त्यामुळे कारवाईची भीती निर्माण झाली होती़ वन कर्मचाऱ्याच्या आंदोलनामुळे पुन्हा चराईला उधाण आले असून लक्ष देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)

Web Title: Due to agitation, grazing flood in forest areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.