शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

९९ शिबिरांमुळे वेळीच ट्रेस झाले तब्बल ३२४ नवीन कोविड बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 5:00 AM

लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी मिळत गेलेल्या शिथिलतेमुळे वर्धेकरही निश्चित्न झाले होते. इतकेच नव्हे तर डिसेंबरच्या अखेरपासून बहुतांश नागरिकांच्या चेहऱ्यावरील मास्कही बेपत्ता झाले होते. वर्धेकरांच्या याच गाफीलतेचा फायदा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरला. फेब्रुवारी महिन्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढताच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात नवीन रणनीती आखून महसूल, पोलीस, आरोग्य व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी नव्या जोमाने कोरोनाच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठीच्या कामाला सुरूवात केली.

ठळक मुद्देवर्धा विभागाची स्थिती : आरोग्य यंंत्रणेला पोलीस, महसूल अन् स्थानिक स्वराज्य संस्थांचे मिळाले सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन नवीन कोविड बाधित ट्रेस करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य विभागाच्यावतीने महसूल, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहकार्याने वर्धा उपविभागात तब्बल ९९ कोविड चाचणी शिबिरे घेण्यात आली. याच शिबिरात तब्बल ३२४ नवीन कोविड बाधित ट्रेस करण्यात आले आहेत.लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी मिळत गेलेल्या शिथिलतेमुळे वर्धेकरही निश्चित्न झाले होते. इतकेच नव्हे तर डिसेंबरच्या अखेरपासून बहुतांश नागरिकांच्या चेहऱ्यावरील मास्कही बेपत्ता झाले होते. वर्धेकरांच्या याच गाफीलतेचा फायदा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरला. फेब्रुवारी महिन्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढताच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात नवीन रणनीती आखून महसूल, पोलीस, आरोग्य व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी नव्या जोमाने कोरोनाच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठीच्या कामाला सुरूवात केली.  त्याचाच एक भाग म्हणून २२ फेब्रुवारीपासून ठिकठिकाणी कोविड चाचणी शिबिर घेण्यास सुरुवात केली. आतापर्यंत वर्धा, सेलू व देवळी तालुक्यात तब्बल ९९ ठिकाणी शिबिर घेऊन ८ हजार १५३ व्यक्तींची कोविड चाचणी केली असता ३२४ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या नवीन कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. एकूणच आयोजित शिबिरांमुळे नवे कोविड बाधित ट्रेस झाल्याने शिबीर उपयुक्तच ठरत आहे.

वर्धा तालुक्यात झाल्या सर्वाधिक कोविड टेस्टवर्धा उपविभागात वर्धा, सेलू व देवळी तालुक्याचा समावेश आहे. या तिन्ही तालुक्यांतील कोविड चाचणी शिबीरांचा विचार केल्यास वर्धा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल ४ हजार ५४८ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी १७५ व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे.

नवीन कोविड बाधित वेळीच ट्रेस व्हावा या हेतूने वर्धा उपविभागात ठिकठिकाणी कोविड चाचणी शिबीर घेण्यात आली. आतापर्यंत ९९ शिबीरात ८ हजार १५३ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३२४ व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे.- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी वर्धा. 

ठिकठिकाणी घेण्यात आलेली कोविड चाचणी शिबीर ही एकट्या आरोग्य विभागामुळेच यशस्वी झालेली नाही. यात महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच पोलीस विभागाचा सिंहाचा वाटा आहेच. कुठल्याही व्यक्तीला कारोनाची लक्षणे असल्यास त्या व्यक्तीने ती न लपविता तसेच कुठलीही भीती मनात न बागळता नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून कोविड चाचणी करून घ्यावी. प्रत्येक व्यक्तीला चांगली आरोग्य सेवा दिली जात आहे.- डॉ. माधुरी बोरकर,तालुका वैद्यकीय अधिकारी,वर्धा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या